ETV Bharat / state

वलघ्या... वलघ्या...च्या गजरात शेतकऱ्यांनी केली वेळ अमावस्या साजरी - दर्शवेळा अमावस्या साजरी

नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतील कर्नाटक सीमेलगत असलेल्या तालुक्यात मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही अमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. 'येळ्ळ अमावस्या' हा मूळ कानडी शब्द आहे.

वेळ अमावस्या साजरी
वेळ अमावस्या साजरी
author img

By

Published : Dec 25, 2019, 9:40 PM IST

नांदेड - वेळ आमावस्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा खास सण आहे. वर्षातली सातवी अमावस्या ही 'वेळ अमावस्या' म्हणून साजरी केली जाते. शेतात किंवा निसर्गाच्या सान्निध्यात हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो.

वेळ अमावस्या साजरी

नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतील कर्नाटक सीमेलगत असलेल्या तालुक्यात मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही अमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. 'येळ्ळ अमावस्या' हा मूळ कानडी शब्द आहे. याचाच अपभ्रंश होऊन 'वेळ अमावस्या' शब्द रुढ झाला.

हेही वाचा - अर्धापुरातील अग्निशमन दलाच्या इमारतीची चौकशी गुलदस्त्यात; चार महिन्यापासून चौकशी रखडली

रब्बी हंगामाच्या काळात ही अमावस्या येते. कडब्यापासून तयार केलेल्या खोपीमध्ये शेतात असणाऱ्या सर्व पिकांची आणि मातीपासून बनवलेल्या पांडवांची(काही भागामध्ये याला लक्ष्मीपूजा देखील म्हणतात) पूजा केली जाते. एका रंगवलेल्या माठामध्ये आंबील भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेला नैवेद्य दाखवून शेतात खोपीवर आणले जाते. वलघ्या.. वलघ्या.. असा जयघोष केला जातो. यासाठी नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रण दिले जाते.

ज्वारी आणि बाजरीच्या पिठाचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली भजी, खीर, आंबील या पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनवलेल्या सर्व पदार्थांचे प्रसाद वाटप केले जाते. लहान मुले या दिवशी पतंग उडवणे, झोका खेळणे यासारखे खेळ खेळतात.

Intro:नांदेड(प्रतिनिधी): वेळ आमावस्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा निसर्गाच्या सानिध्यातला सण. वर्षातली सातवी आमावस्या म्हणजे वेळ आमावस्या. बळीराजा यासणाची आतुरतेने वाट पाहात असतात. शेतात किंवा निसर्गाच्या सान्निध्यात हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती तालुक्यात देखील साजरा करण्यात आला.Body:वलघ्या... वलघ्या..!च्या गजरात शेतकऱ्यांनी केली वेळ आमावस्या साजरी...

नांदेड(प्रतिनिधी): वेळ आमावस्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा निसर्गाच्या सानिध्यातला सण. वर्षातली सातवी आमावस्या म्हणजे वेळ आमावस्या. बळीराजा यासणाची आतुरतेने वाट पाहात असतात. शेतात किंवा निसर्गाच्या सान्निध्यात हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती तालुक्यात देखील साजरा करण्यात आला.
नांदेडात लातूर आणि कर्नाटक सीमेलगत असलेल्या तालुक्यात मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द "येळ्ळ अमावस्या" म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला आहे. खरीप हंगामाच्या शेवटचा आणि रब्बी हगांच्या सुरवातीच्या काळात ही आमावस्या येते. ग्रामीण भागात याला सुगीचा काळ देखील म्हणतात. शेतकरी सकाळी लवकरच घरातील सर्व सदस्य घेऊन शेतात जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या खोपी मध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची आणि मातीपासून बनवलेल्या पांडवांची(काही भागामध्ये लक्ष्मीपुजा देखील म्हणतात) पूजा केली जाते. तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात खोपिवर आणले जाते. वलघ्या.. वलघ्या..! च्या घोषणा देत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी मित्र परिवाराला देखील आवर्जून आमंत्रण दिलं जातं.
ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली भज्जी, खिर, आंबिल पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रुपात आस्वाद घेतात. तर बच्चे कंपनीसाठी ही पर्वणीच असते. यासणाला कोणी पतंग उडवतं तर कुणी झोका खेळून आकाशाला गवसणी घाल्याचा आनंद घेतात.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.