नांदेड - शहरात गुन्हेगारी वाढली असून एकावर गोळीबार तर एका व्यक्तीचे सात लाख 70 हजार पळविल्याची धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. शहरात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. दोन्ही घटनेत पिस्तुलाचा आणि खंजरचा वापर करण्यात आला.
खंजरचा धाक दाखवून सात लाख लुटले -
गोकुळनगरमध्ये बालाजी ट्रेडिंग नावाचे सिमेंट व्यापारी हनुमान अग्रवाल यांचे दुकान आहे. या दुकानावरील दिवाण रामराव चव्हाण हे दुकान बंद करुन घराकडे जात होते. यावेळी तीन दरोडेखोरांनी रामराव चव्हाण यांना खंजर दाखवून धमकी दिली. यानंतर सात लाख 70 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळविली.
श्रीनगर भागात गोळीबार -
श्रीनगर भागात असलेल्या अक्वा वाॅटर फिल्टर प्लान्टवर बसलेल्या सोनू कल्याणकर यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. सोनू कल्याणकर यांनी गोळीबारातून बालंबाल बचावले.
नांदेडमध्ये बुधवारी रात्री एका तासात एकावर गोळीबार आणि दुसऱ्या घटनेत खंजरचा धाक दाखवून लाखोंची लूट केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. घटनास्थळावर पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी भेट देऊन गुन्हेगारांच्या शोधात पथके रवाना केली आहेत. दरम्यान, शहरातील मध्यवर्ती भागात ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - सातारा : अनैतिक संबंधावरुन पत्नीसह प्रेयसीचा खून; आरोपीला कर्नाटकातून अटक