नांदेड - किनवट तालुक्यातील शिवणी येथे सोमवारी दुपारी घराला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत संपूरण घर जळून भस्मसात झाले. या आगीत दोघे जण किरकोळ भाजल्याची माहितीही मिळाली आहे.
शिवणी येथील रहिवासी सुभाष गणपतराव कोरेबाड हे हमाली करुन कुटूंबाचा चरीतार्थ चालवतात. त्यांच्या घराला सोमवारी (दि 9 मार्च) दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतू आगीची भीषणता जास्त असल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
हेही वाचा - 'या' दिवशी मध्य रेल्वेवरील लाईन ब्लॉकमुळे मुंबईला जाणाऱ्या दोन एक्स्प्रेस रद्द
या घटनेत घरातील दोघे जण भाजले असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या आगीत कोरेवाड यांच्या घरातील अन्न धान्यासह सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे त्यांचे कुटुंबीय उघड्यावर पडले असून शासनाने मदत करुन कुटुंबाचे त्यांचे पूनर्वसन करण्याची मागणी होत आहे.