नांदेड - जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील कुमठा येथील विवाहितेने विष्णुपुरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिच्या पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निकिता देवानंद वानखेडे, असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा जिल्ह्यातील तरोडा येथील देवानंद वानखेडे यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, काही दिवसांनी पतीसह श्रीकृष्ण वानखे़डे, संगिता वानखेडे यांनी तिला माहेरून दोन लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. तसेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. त्यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार तिचे वडिल नाना तायडे यांनी केली आहे. त्यानुसार तिचा पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक शेख असद करीत आहेत.