ETV Bharat / state

अशोक चव्हाण यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट कणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल - ashok chavan covid 19 test positive

अशोक चव्हाण हे कोरोनाच्या आजारातून लवकर बरे व्हावेत, यासाठी जिल्हाभरातून त्यांचे समर्थक आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व पक्षांमधील नेतेमंडळी प्रार्थना करत आहेत. सिडको भागात राहणार्‍या गोविंद पाटील कदम शिरसीकर याने फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केली होती.

ashok chavan
अशोक चव्हाण
author img

By

Published : May 26, 2020, 7:04 PM IST

नांदेड - कोरोना संसर्गाचा मुकाबला करणार्‍या सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहणार्‍या एका युवकाविरुद्ध नायगाव तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा करण्यात आला आहे. अत्यंत निदंनीय मजकूर लिहण्यावरून काँग्रेस कार्यकर्ते संतापले होते. अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी झाल्याचे स्पष्ट झाले.

चव्हाण हे कोरोनाच्या आजारातून लवकर बरे व्हावेत, यासाठी जिल्हाभरातून त्यांचे समर्थक आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व पक्षांमधील नेतेमंडळी प्रार्थना करत आहेत. सिडको भागात राहणार्‍या गोविंद पाटील कदम शिरसीकर याने फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केली होती.

या प्रकरणी गोविंद पाटील कदम शिरसीकर याच्या विरोधात नरसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी तक्रार सुधाकर भिलवंडे, नजीर बागवान, नजीर फरिद्साब शेख, फारुख महेबूब बेग पटेल यांनी दिली होती. यावरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात सोमवारी दिली होती. यावरून सोमवारी सांयकाळी गोविंद शिरसीकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही पोस्ट बघितल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अशोक चव्हाण यांच्या समर्थक तरुणांनी त्यास भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत खडा समाचार घेत माफी मागण्यास भाग पाडले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.