ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात चैत्यन्यमय वातावरणात लक्ष्मीपूजन; फटाक्यांची आतिषबाजी....! - Nanded Diwali celebration

नांदेड जिल्ह्यात शनिवारी लक्ष्मीपूजनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. आमावस्येच्या रात्री शहराचा सर्व भाग आसंमतात प्रकाशात न्हाऊन निघाला होता. घरोघरच्या आणि बाजारपेठेमधील पूजा पूर्ण होताच फटाक्यांच्या धमाक्याचे आवाज ऐकू येऊ लागले होते.

दिवाळी
दिवाळी
author img

By

Published : Nov 15, 2020, 10:30 AM IST

नांदेड - लक्ष्मीच्या सोनपावलांच्या चैतन्यमयी वातावरणात नांदेड जिल्ह्यात शनिवारी लक्ष्मीपूजनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. प्रकाशाची उधळण करीत आलेला हा सण फटाक्यांच्या आतिषबाजीने साजरा केला. संसर्गाच्या भीतीमुळे घरात बसलेले नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे दीपमाळांची रोषणाई, पणत्यांचा झगमगाट, दारासमोरच्या रांगोळ्यांनी वातावरण मंगलदायी बनले होते. यावेळी नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आमावस्येच्या रात्री शहराचा सर्व भाग आसंमतात प्रकाशात न्हाऊन निघाला होता. लक्ष्मीपूजनासाठी नांदेडकर दोन दिवसांपासूनच सज्ज झाले होते.

नांदेड जिल्ह्यात दिवाळी साजरी

दिवाळी वर्षांतील मोठा सण -

सूर्य मावळतीला जावू लागताच, दरवाज्यांवर पिवळ्या झेंडूच्या माळा डौलाने लटकू लागल्या. व्यापारी वर्गाने दुपारीच व्यवहार बंद करून पुजेची तयारी सुरू केली. सायंकाळी महत्वाच्या बाजारपेठामध्ये पूजेचे वातावरण दिसत होते. घरोघरच्या आणि बाजारपेठेमधील पूजा पूर्ण होताच फटाक्यांच्या धमाक्याचे आवाज ऐकू येऊ लागले होते. लक्ष्मीपूजनानिमित्त नोटा, नाणी तसेच सोन्या चांदीच्या नाण्यांवरील लक्ष्मीच्या छापांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. धनत्रयोदशीनिमित्त आरोग्याची देवता धन्वंतरी, धनाची देवता कुबेर, लक्ष्मी, गणपतीची पूजा करण्यात आली.

लक्ष्मीपूजनाच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी -

शनिवारी लक्ष्मीपूजन असल्याने व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजाचे साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे लाह्या बत्तासे, लक्ष्मी मूर्ती, लाल रंगाच्या वह्या व इतर साहित्य खरेदीसाठीही दुपारपर्यंत लगबग सुरू होती. कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष करत बाजारात खरेदी सुरू झाली होती. शनिवारी नरकचतुर्दशी निमित्ताने अभ्यंग स्नान करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

मुहूर्त ठरवून केली पूजा -

घरासमोर आकर्षक रांगोळीही काढण्यात आल्या होत्या. लक्ष्मीपूजनासाठी दुपारी बारा ते साडेचार वाजेपर्यंत व सायंकाळी पावणेसहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत, रात्री नऊ ते साडेबारा वाजेपर्यंत लक्ष्मीपूजनासाठीचा शुभमुहुर्त होता. अनेकांनी आपआपल्या सोयीप्रमाणे मुहूर्त ठरवत लक्ष्मी पूजनाची तयारी केली तर काही ठिकाणी लक्ष्मीपूजन करण्यात आले.

सोमवारी पाडवा, भाऊबीज एकत्र कार्तिक शुध्द प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा वा पाडवा याला दिवाळी पाडवा ही म्हणतात. सोमवारी पाडवा आहे. यंदा एक तिथी क्षय झाल्याने याच दिवशी भाऊबीज म्हणजेच यम द्वितीया देखील आली आहे. पाडव्याला नवीन वस्तूची खरेदी केली जाते. सुवासिनी त्यांच्या पतीला ओवाळतात. तर भाऊबीजेला बहिण भावाला ओवाळते. भावा बहिणीच्या पवित्र प्रेमाचा हा दिवस मानला जातो.

हेही वाचा - पंतप्रधानांच्या हस्ते राजस्थानमध्ये सुरीश्वर जी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.