नांदेड - शहरामध्ये फळविक्रीच्या बाजारात कोरोनाचा फैलाव होऊ शकेल, अशी स्थिती आहे. नांदेडमध्ये फळांच्या गाड्या माळटेकडी भागातील होलसेल बाजारात येत असतात. येथून नांदेड शहर आणि जिल्ह्यात सर्व ठिकाणी फळांचा पुरवठा होतो. याच होलसेल बाजारात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून कोणतीही विशेष काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा... #coronavirus : मुंबईतील हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
हजारो फळ विक्रेते इथे कोणत्याही सुरक्षेविना मुक्तपणे वावरत आहेत. मास्क, सॅनिटायझरचा इथे वापरही होताा दिसत नाही. त्यामुळे या व्यक्ती आणि फळांच्या सहाय्याने कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. विशेष म्हणजे महापालिकेने या बाजारात सुरक्षा ठेवत नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी होती. मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले असावे, अशी शंका उपस्थित होत आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. अशा परिस्थितीत कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराचा फैलाव झाला तर जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित केला जातोय.