ETV Bharat / state

'हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे' - fruit crop insurance

हवामानावर आधारित फळपिक विमा योजना ही नांदेड जिल्ह्यात केळी, आंबा, मोसंबी या पिकांसाठी लागु केली आहे.

nanded
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे
author img

By

Published : Oct 10, 2020, 10:03 PM IST

नांदेड - हवामानावर आधारित फळपिक विमा योजना ही नांदेड जिल्ह्यात केळी, आंबा, मोसंबी या पिकांसाठी लागु केली आहे. या योजनेंतर्गत सन 2020 हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या फळपिकांना अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान, आर्द्रता, वेगाचा वारा व गारपीट या हवामान धोक्यापासुन संरक्षण मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे विमा हप्ता रक्कम भरुन पिक संरक्षित करणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी दिली आहे.

आबिंया बहार विमा हप्ता दर पुढीलप्रमाणे आहेत. केळी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम नियमित 1 लाख 40 हजार रुपये तर गारपीटसाठी 46 हजार 667 रुपये एवढी आहे. तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 7 हजार रुपये तर गारपीट 2 हजार 333 रुपये आहे. हा विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2020 आहे.

आंबा फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम नियमित 1 लाख 40 हजार रुपये तर गारपीट 46 हजार 667 रुपये एवढी आहे. तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 7 हजार रुपये तर गारपीट 2 हजार 333 रुपये आहे. हा विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2020 आहे.

मोसंबी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम नियमित 80 हजार रुपये तर गारपीट 26 हजार 667 रुपये एवढी आहे. तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 4 हजार रुपये तर गारपीट 1 हजार 333 रुपये आहे. हा विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2020 आहे.

ही योजना नांदेड जिल्ह्यात अधिसुचित फळपिकांसाठी पुढीलप्रमाणे अधिसुचित महसुल मंडळांना लागू राहिल. यात अधिसुचित केळी फळपिकासाठी नांदेड तालुक्यात तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी. अर्धापुर तालुक्यात अर्धापुर, दाभड, मालेगाव. मुदखेड तालुक्यात मुदखेड, मुगट, बारड. लोहा तालुक्यात शेवडी बा. हदगाव तालुक्यात हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी. भोकर तालुक्यात भोकर. देगलुर तालुक्यात मरखेल, हाणेगाव. किनवट तालुक्यात किनवट, इस्लापुर, शिवणी, बोधडी. उमरी तालुक्यात उमरी तर नायगाव तालुक्यात बरबडा ही मंडळे आहेत.

आंबा फळपिकासाठी अर्धापुर तालुक्यात दाभड, पाळेगाव. कंधार तालुक्यात कंधार, मुखेड तालुक्यात मुक्रामाबाद. तर मोसंबी फळपिकासाठी अर्धापुर तालुक्यात मालेगव. नांदेड तालुक्यात लिंबगाव, विष्णुपुरी तर मुदखेड तालुक्यात बारड या अधिसुचित महसूल मंडळाचा यात समावेश आहे.

प्रधानमंत्री फसल बिमा योजना हवामानावर आधारित फळपिक विमा आंबिया बहारमध्ये वरील अंतिम दिनांकापुर्वी जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी व नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.