ETV Bharat / state

इंधन दरवाढीमुळे मशागतीच्या खर्चात वाढ, शेतकरी संकटात - Nanded District Latest News

गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शेतात यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला असून, ट्रॅक्टरच्या साह्याने अनेक कामे केली जातात. डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे मशागतीचा खर्च 25 टक्क्यांनी वाढला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, ही इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.

इंधन दरवाढीमुळे मशागतीच्या खर्चात वाढ
इंधन दरवाढीमुळे मशागतीच्या खर्चात वाढ
author img

By

Published : Mar 12, 2021, 4:43 PM IST

नांदेड - गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शेतात यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला असून, ट्रॅक्टरच्या साह्याने अनेक कामे केली जातात. डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे मशागतीचा खर्च 25 टक्क्यांनी वाढला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, ही इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.

नांदेड जिल्ह्यात शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. अलीकडच्या काळात अल्पभूधारक शेतकरीही ट्रॅक्टर वापरू लागले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरची संख्या आहे. नांगरी करण्यापासून ते पालाकुट्टी आणि विविध पिकात फवारणी करण्यासाठी देखील टॅक्टरचा वापर होतो. मात्र आता डिझेलचे दर वाढल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

मशागतीसाठी यांत्रिकीकरणावर भर

एक पीक काढले की शेतकरी लगेच दुसऱ्या पिकाची तयारी करत असतो, दरम्यान शेतीची मशागत कमी कालावधीत व्हावी यासाठी मशागतीसाठी शेतकऱ्यांकडून यांत्रिकीकरणावर भर दिला जातो, त्यात ट्रॅक्टरचा वापर सर्वाधिक होतो, मात्र गेल्या काही दिवसांपासून डिझेलचे भाव वाढल्याने, मशागतीसाठी येणाऱ्या खर्चात देखील वाढ झाली आहे, याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

इंधन दरवाढीमुळे मशागतीच्या खर्चात वाढ

शेतीमालाची वाहतूक देखील खर्चिक

एकाबाजूला इंधनाचे वाढते दर, तर दुसऱ्या बाजूला भाजीपाल्यासह अन्य पिकांना अपेक्षित दर न मिळणे, यामुळे शेतकरी आधिच संकटात सापडला आहे. त्यातच आता इंधनाचे दर वाढल्याने, पिकांच्या वाहतूक खर्चात देखील मोठी वाढ झाली आहे. शेतीसाठी लागणार खर्च आणि मिळणारे उत्पादन याची सांगड घालने शेतकऱ्यांना कठीन झाले आहे. गेल्या वर्षी एकरी ७५०० ते ८००० रुपये येणारा खर्च आता १२,००० ते १३, ५०० रुपयांवर गेला आहे. गेल्या महिनाभरापासून डिझेल आणि पेट्रोलच्या दरात दररोज पंचवीस ते तीस पैशांनी वाढ होत आहे. सध्या डिझेलचा दर प्रति लिटर ९० रुपये आहे.

असे वाढले दर

मशागत प्रकार 2020 2021
1)नांगरणी 2000 2500
2)रोटर मारणे 2000 2500
3)खुरटणी 1000 1500
4)पेरणी 1300 1500
5)पालकुट्टी 2000 2500
6)हळद काढणी 1600 2000

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.