नांदेड - हदगाव तालुक्यातील पाथरड येथे ३५ वर्षीय शेतकऱ्याने कर्ज व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली आहे. शिवाजी दिवटे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला आहे.
पाथरड येथील तरुण शेतकरी शिवाजी बाबुराव दिवटे हे सततची नापिकी आणि बँकेच्या कर्जाने कंटाळले होते. या विवंचनेतून गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
याप्रकरणी संभाजी बाबुराव दिवटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तामसा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक जगाडे हे पुढील तपास करत आहेत.