ETV Bharat / state

Dhondge contact with BRS : शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांची बीआरएसच्या नेत्यांसोबत चर्चा - यांची बीआरएसच्या नेत्यांसोबत चर्चा

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या पक्षाचे सध्या नांदेड जिल्ह्याकडे अधिक लक्ष आहे. अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही काहीसे लांब असणारे शेतकरी नेते व माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचेही नाव आता समोर आले आहे. नुकतीच त्यांनी तेलंगणा येथे या पक्षाच्या नेत्यांशी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. (Dhondge contact with BRS)

Shankaranna Dhondges discussion with BRS leaders
शंकरअण्णा धोंडगे यांची बीआरएसच्या नेत्यांसोबत चर्चा
author img

By

Published : Mar 9, 2023, 2:56 PM IST

नांदेड: महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्यासाठी जुळवाजुळव करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने अन्य पक्षातील नाराज नेत्यांना आपल्या पक्षात यावे यासाठी बीआरएसने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे कॉंग्रेससह अन्य पक्षातील अनेक नेते हळूहळू त्यांच्या गळाला लागत आहेत. अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही काहीसे लांब असणारे शेतकरी नेते व माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे बीआरएसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे पुढे आले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी तेलंगणा येथे जाऊन या पक्षाच्या नेत्यांशी प्राथमिक स्वरुपाची चर्चा केल्याचेही सांगितले जात आहे. यावेळी त्यांच्या सोबत दत्ता पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते अशी माहितीही समोर येत आहे.

भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणात स्वबळावर आपले साम्राज्य निर्माण केले. यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार करण्याची योजना आखली. यासाठी सर्वप्रथम त्यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळविला आहे. नांदेड येथे केसीआर यांची नुकतीच जंगी सभा झाली. या सभेच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन घडवले. त्याचवेळी त्यांचे इरादे स्पष्ट झाले होते. पण, केसीआर यांच्यासाठी हा राजकीय मार्ग खडतर असला तरी लढवय्ये आणि शेतकरी नेते म्हणून ओळखले जाणारे केसीआर व त्यांचे मंत्री तसेच आमदार हे नदिड जिल्ह्यातील विविध पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन चीआरएस पक्ष हा शेतकरी व गोरगरिबांचा पक्ष असल्याचे पटवून देत आहेत. यात त्यांना बर्यापैकी यश देखील आल्याचे मानले जाते.

महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील अनेक गावे नांदेड जिल्ह्यालगत आहेत. दैनंदिन व्यवहारापासून ते रोटी-बेटी व्यवहारापर्यंत महाराष्ट्र आणि तेलंगणातील विशेषतः नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क आहे. तेलंगणात सत्ताधारी टीआरएस पक्षाच्या वेगवेगळ्या योजनांमुळे तेथील जनतेला कसा फायदा झाला आहे, हे माहित असलेल्या सीमावर्ती भागातील लोकांवरही केसीआर यांच्या कार्यपद्धतींचा प्रभाव आहे. त्यांच्या कामामुळे त्यांनी सीमावर्ती भागात राहणार्या जनतेवर चांगलीच भूरळ पाडली आहे. याचा फायदा मतात रूपांतरीत करण्यासाठी नुकतीच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेल्या बीआरएस पक्षाला कसा फायदा होईल.

या दृष्टीने बीआरएसचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येणार्या काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर डोळा ठेवून बीआरएसने काम सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीत या पक्षाला किती यश मिळेल हे येणारा काळच ठरवेल पण, त्या दृष्टीने बीआरएसने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शेतकर्यांचे नेते म्हणून ज्यांची ओळख गेल्या अनेक वर्षापासून नांदेड तसेच मराठवाड्यातील जनतेला झाली आहे, अशा शंकरअण्णा धोंडगे यांच्या संपर्कात बीआरएसचे नेते आहेत. घोंडगे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असले तरी अलिकडच्या काळात ते पक्षात राहूनही काहीसे अंतर ठेवून आहेत. राष्ट्रवादीच्या तिकिटावरच ते याआधी लोहा-कंधार मतदारसंघातून निवडून देखील आले आहेत.

राष्ट्रवादी किसान भारती या आघाडीचे ते काही काळ प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. राष्ट्रवादीत येण्याआधी शंकरअण्णा यांनी शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेत अनेक वर्षे काम केले. शेतकरी संघटनेच्या अनेक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. कापूस आंदोलनात तर त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. संघटनेत काम करताना चळवळ म्हणून काम केलेल्या या कार्यकर्त्यांला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर आमदार होण्याची संधी मिळाली. परंतु, आता ते पक्षातल्याच गटबाजीमुळे काहीसे दूर फेकले गेले आहेत.

त्यांचे राजकीय विरोधक असलेले हरिहरराव भोसीकर यांना पक्षाने जिल्हाध्यक्ष पदावर बसवून शंकरअण्णा यांचे राजकीयदृष्ट्या वजन कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे धोंडगे समर्थकांना वाटते. एकूणच शंकरअण्णा धोंडगे नाराज असल्याची बाब हेरून बीआरएसने एका शेतकरी नेत्याला जवळ करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अर्थातच त्यांना बीआरएस प्रदेश पातळीवरची मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे काही दिवसांपुर्वी हैद्राबाद येथे जाऊन त्यांनी पक्षप्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. शंकरअण्णा धोंडगे हे बीआरएसच्या 'मोटारी त बसले तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांना ते बर्यापैकी अडचणी निर्माण करू शकतात, असा राजकीय निरिक्षकांचा अंदाज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.