नांदेड - हदगाव तालुक्यातील रुई येथील एका शेतकऱ्याचा काल दुपारी कालव्यात आंघोळीसाठी गेला असता बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नातेवाईकांनी कालव्यात शोधाशोध केली असता आज आंबाळा शिवारात शेतकऱ्याचा मृतदेह सापडला आहे. पंजाबराव गंगाधर कहूळकर, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हदगाव तालुक्यातील रुई येथील माजी सरपंच गंगाधर कहूळकर यांचा मोठा मुलगा पंजाबराव हा वडिलोपार्जित मिळालेली शेती कसून उपजिविका चालवायचा. काल शेतातून घरी जात असताना तापमान अधिक असल्याने तो कयाधू शाखे कालव्यात आंघोळीसाठी उतरला. मात्र, त्यांच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.