ETV Bharat / state

Suicide News : रब्बीची तयारी करू म्हणाले अन् घेतला गळफास; कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Farmer commits suicide due to debt

सततच्या नापिकीमुळे संसाराचा गाडा कसा चालवावा, या चिंतेत नायगाव तालुक्यातील नरंगल येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या ( Suicide by hanging ) केली.

Farmer commits suicide due to debt
कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
author img

By

Published : Oct 17, 2022, 3:05 PM IST

नांदेड : सततच्या नापिकीमुळे संसाराचा गाडा कसा चालवावा, या चिंतेत नायगाव तालुक्यातील नरंगल येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या ( Suicide by hanging ) केली. ही घटना १५ ऑक्टोबर रोजी घडली. प्रदीप मुकुंद पटेकर वय ३५ असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी प्रदीप यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. अवंदाचं पीक तर गेलं, आता रब्बीची तयारी करू, गवत कापा, ट्रॅक्टर लावा असे म्हणत सर्वांना शेतात पाठवले आणि दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरात गळफास घेतल्याचे प्रदीप यांचे बंधू प्रवीण पट्टेकर यांनी सांगितले.

पिकांना जगवणे कठीण : जिल्ह्यात १० महिन्यांत जवळपास १२१, तर या चार महिन्यांत ६९ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळले जिल्ह्यात यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच अतिवृष्टी झाली. दुबार पेरणी करूनही पिके पाण्याखाली गेली. पिकांना जगवणे कठीण होऊन बसल्याने शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. प्रदीप यांना चार भावात चार एकर शेती आहे. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ३२ हजारांचे कर्ज घेतले होते. त्यामुळे कर्ज मिळाले नाही. उसनवारी करून पेरणी केली. पण नुकसान झाल्याने ते चिंतेत होते. मागील महिन्यात त्यांना बँकेची नोटीस आली. त्यामुळे आणखीच त्यांना मानसिक तणाव आला. प्रदीप यांच्या त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

कर्जामुळे आत्महत्या : कौठा तांडा हे अवघ्या १७०० लोकसंख्येचं गाव. येथील बंडू गणपत राठोड वय ४५ या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. यंदा अतिवृष्टीमुळे शेतातील पीक पूर्ण नाहीसे झाले. त्यामुळे आसपास कामही मिळेना म्हणून एक भाऊ हैदराबादला मजुरीसाठी स्थलांतरित झाला. ३ एकरवर लावलेलं कापसाचं पीक पूर्ण गेलं. आता वृद्ध आई-वडील व दोन मुले त्यांच्या पश्चात आहेत. एकीकडे घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेचा तगादा आणि दुसरीकडे दैनंदिन उदरनिर्वाह कसा भागवावा हा प्रश्न या कुटुंबासमोर आहे. गावातील बहुतांशी तरुणांना आता तेलंगणात जाण्याशिवाय पर्याय नसल्याचं ग्रामस्थ सांगतात.

आढावा घेऊन माहिती देतो : नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात आल्या याविषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी नुकताच रुजू झालो आहे. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा आढावा घेऊन या संदर्भात सविस्तर माहिती देतो.

मुले आता मजुरीसाठी आसपासच्या गावात भटकत : तालुक्यातील सवणा गावात माधव सटवाजी कल्याणे वय ५८ यांनीही कर्जाच्या चिंतेत जीवन संपवले. अतिवृष्टीमुळे त्यांच्या ३ एकर शेतातील सोयाबीन, कापूस पूर्ण वाया गेले. कर्ज भरण्याचा तगादा वाढल्याने त्यांनी आत्महत्या केली. त्यांची दोन्ही मुले आता मजुरीसाठी आसपासच्या गावात भटकत आहेत. कल्याणे यांच्याच शेजारी मारुती धबडगे म्हणाले की, मजुरी मिळत नसल्याने शेतकरी तेलंगणात जात आहेत. खरीप हंगामात कर्ज मिळेल म्हणून आधीचे कर्ज नील करण्यासाठी शेकडा ५ ने ५० हजार रुपये भरले. लगेच कर्जाचे पुनर्गठन करतो, असे बँकेच्या अधिकाऱ्याने आश्वासन दिले. पण रब्बी आले तरी अद्याप फाइल मंजूर झाली नसल्याचे धबडगे म्हणाले.

तेलंगणात मिळते मजुरी जास्त : अतिवृष्टीमुळे यंदा हिमायतनगर तालुक्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यात तुरळक ठिकाणी मजुरीची कामे मिळतात. त्यातही १५० ते २०० रुपये रोज मिळतो. त्यामुळे शेतकरी तेलंगणातील म्हैसा, आदिलाबाद, निझामाबाद, करीमनगर, निर्मल, हैदराबाद या गावांत जात आहेत. तेथे त्यांना ४०० ते ५०० रुपये मजुरी मिळते. दिवाळीनंतर बहुतांश कुटुंबे पुढील सहा महिन्यांसाठी तेथे बस्तान हलवतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.