ETV Bharat / state

अर्धापूर तालुक्यात सालगडी शेतमजुराची आत्महत्या...! - आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली

सालगडी म्हणून शेतमजुरी करत असलेल्या वाकद ता. भोकर येथील एका गरीब इसमाने शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.  ही घटना दि. ४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. परंतू आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून अर्धापूर पोलीसात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Farm worker suicide at Nanded district
सालगडी शेतमजुराची आत्महत्या
author img

By

Published : Feb 4, 2020, 10:30 PM IST

नांदेड: अर्धापूर तालुक्यातील लहान येथील एका शेतक-याकडे सालगडी म्हणून शेतमजुरी करत असलेल्या वाकद ता. भोकर येथील एका गरीब इसमाने शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. परंतू आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून अर्धापूर पोलीसात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, यादव उकाजी भिसे रा. वागद ता.भोकर हे लहान येथील शेतकरी प्रविण विठ्ठल गिरी यांच्या आंबेगाव ता. अर्धापूर येथील शेतात सालगडी म्हणून काम नोकरी करत होते. ते आपल्या कुटुंबासह त्या शेतात राहत होते. सोमवार दि. ३ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळ पर्यंत शेतात काम करून ते रात्री झोपले होते. परंतु मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ते शेतातील पळसाच्या झाडाला रुमालाने गळफास लावलेला व मृतावस्थेत ते निदर्शनास आले. आत्महत्या सदृश्य मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्यांनी आत्महत्या केली का अन्य काही कारण आहे हे अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी मयताचा मुलगा राम यादव भिसे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून पोलीसात आकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे अमलदार गुरूलिंग मठदेवरू, संदीप कारामुंगे यांनी दिली. सदरील प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एल.आर.राठोड, अविनाश खरबे पाटील हे करीत आहेत.

Intro:अर्धापूर तालुक्यात शेतमजुराची आत्महत्या...!
Body:अर्धापूर तालुक्यात शेतमजुराची आत्महत्या...!

नांदेड: अर्धापूर तालुक्यातील लहान येथील एका शेतक-याकडे सालगडी म्हणून शेतमजुरी करत असलेल्या वाकद ता. भोकर येथील एका गरीब इसमाने शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असून ही घटना दि.४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे.परंतू आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून अर्धापूर पोलीसात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की,यादव उकाजी भिसे रा. वागद ता.भोकर हे लहान येथील शेतकरी प्रविण विठ्ठल गिरी यांच्या आंबेगाव ता.अर्धापूर येथील शेतात सालगडी म्हणून काम नौकरी करत होते. ते आपल्या कुटुंबासह त्या शेतात राहत होते. सोमवार दि.३ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळ पर्यंत शेतात काम करून ते रात्री झोपले होते.परंतु मंगळवार, दि.४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:०० वाजताच्या सुमारास ते शेतातील पळसाच्या झाडाला रुमालाने गळफास लानलेला व मृतावस्थेत ते निदर्शनास आले.आत्महत्या सदृश्य मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.त्यांनी आत्महत्या केली का अन्य काही कारण आहे हे अद्याप समजू शकले नाही.याप्रकरणी मयताचा मुलगा राम यादव भिसे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून पोलीसात आकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती ठाणे अमलदार गुरूलिंग मठदेवरू, संदीप कारामुंगे यांनी दिली असून सदरील प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एल.आर.राठोड, अविनाश खरबे पाटील हे करीत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.