ETV Bharat / state

घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू - FIRE

आग लागली त्यावेळी घरातील सर्वजण गाढ झोपेत असल्याने काही कळायच्या आतच ते आगीच्या कह्यात सापडले होते.

मुक्रमाबाद येथील पवार कुटुंबीयांचा आगीत जळून मृत्यू
author img

By

Published : Mar 18, 2019, 1:17 PM IST

नांदेड - घराला लागलेल्या आगीत सापडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे घडली आहे. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्याचे समजते. एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुक्रमाबाद येथील पवार कुटुंबीयांचा आगीत जळून मृत्यू

मुक्रमाबाद येथील माळरानावर लाकडी बांबू आणि पत्र्याच्या सहाय्याने तयार केलेल्या घरात पवार कुटुंब राहत होते. या घराला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली. घराला चारही बाजुंनी लाकडाचे आणि गवताच्या कुडाने वेढले असल्याने या आगीने मोठा पेट घेतला. आग लागली त्यावेळी घरातील सर्वजण गाढ झोपेत असल्याने काही कळायच्या आतच ते आगीच्या कह्यात सापडले होते.

या आगीत व्यकंट पवार (वय ३९), त्यांची पत्नी रेखा (वय ३२), मुलगी काजल (वय ८) या तिघांचा मृत्यू झाला. तर, करण हा १२ वर्षीय मुलगा वाचला आहे. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पण, या प्रकारमुळे मुक्रमाबाद परिसरात शोककळा पसरली आहे.

Intro:नांदेड - घराला आग लागून एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

नांदेड : मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील दिवसभर मजुरीचे काम करून घरात गाढ झोपेले असताना घराला अचानक आग लागून पती, पत्नी व मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मुक्रमाबाद येथे सोमावार दि १८ रोजी मध्ये रात्री घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वञ हळहळ व्यक्त होत असून या घटनेतून आकरा वर्षीय मुलगा बचावला आहे. Body:
मुक्रमाबाद येथील माळरानावर लाकडी बांबू आणि लोखंडी पत्राच्या मदतीने तयार केलेल्या घरात राहत होते. या घराला अचानक मध्यरात्री आग लागली होती.ही आग विझविण्यासाठी आसपास कोणीही नसल्यामुळे व घराला चारही बाजूंनी लाकडाचे व गवताच्या कुडानी वेढलेले असल्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आग ज्यावेळी लागली. त्यावेळी घरातील सारे गाढ झोपेत होते.Conclusion:
या आगीत 39 वर्षीय व्यंकट पवार, 32 वर्षीय पत्नी रेखा आणि 8 वर्षाच्या काजल या मुलीचा असा एकूण तिघांचा मृत्यु झाला आहे. या आगीतून 12 वर्षीय करण हा मुलगा बचावलाय. दरम्यान या आगीच कारण अद्याप अस्पष्ठ आहे. या घटनेने मुक्रमाबाद गावावर शोककळा पसरली. दरम्यान पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपास सुरु केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.