ETV Bharat / state

'सरसकट मदत जाहीर करा, अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येची परवानगी द्या'

सरकारने पंचनाम्याचे नाटक न करता सरसकट अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा व शासकीय मदत द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली आहे.

author img

By

Published : Nov 2, 2019, 10:48 AM IST

अतिवृष्टीने नुकसान

नांदेड - माहूर तालुक्यात २५ ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कापसाचे पीकही हातातून गेले आहे. खरीप हंगामाचा तोंडापर्यंत आलेला घास पावसाने हिसकावून घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनाम्याचे नाटक न करता अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट तातडीने पीक विमा व शासकीय मदत द्या, अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली आहे.

माजी आमदार प्रदीप नाईक यांचा नुकसान पाहणी दौरा

अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर केवळ १० टक्के नुकसान झाल्याचे सांगून शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत, असा आरोप नाईक यांनी केला. प्रचंड प्रमाणात अतीवृष्टी झाल्याने माहूर तालुक्यातील शेत मालाच्या नुकसान भरपाईबाबत त्यांनी राज्यपालांनाही पत्र लिहले आहे.

हेही वाचा - परतीच्या पावसाचा ३२५ तालुक्यांना फटका, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश - मुख्यमंत्री

किनवट, माहूर तालुक्यात १ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस आणि सोयाबिन पिकाची लागवड आहे. त्यातील ८० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. २५ ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. दोन्ही तालुक्यात नुकसानीची समान स्थिती आढळून आली आहे.

माजी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट आणि माहूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पाहणी केली. मौजे हडसनी, दत्तमांजरी, वझरा, वानोळा, मेंडकी, मुंगशी, पाचोंदा, टाकळी, मुरली, लांजी, मेट, उमरा मदनापूर, हरडप, सावरखेड, वडसा, गोकुळ, आष्टा, पडसा आदी गावामध्ये पिक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार, व शासनाकडून हलगर्जीपणा होत असल्यास जनतेच्या खांद्याला खांदा लावून तीव्र जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

हेही वाचा - परतीच्या पावसाने द्राक्ष बागयतदारांचे मोडले कंबरडे, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत खरीप हंगामाचे पिक घरात येण्याच्या तोंडावरच मोठे अस्मानी संकट उभे राहिले. किनवट, माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. मात्र, सत्तेचे राजकारण करणाऱ्या भाजपा व शिवसेना विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठ दिवस झाले असले तरी मुख्यमंत्री कुणाचा या मुद्द्यावरून एकमेकांशी भांडत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्याचे भाजपा-शिवसेनेला सोयरसुतक नाही. किनवट माहूर तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी शेतकरी व उपस्थित नागरिकांना यावेळी बोलताना सांगितले.

वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नाईक यांनी दिला. पीक पाहणी दौऱ्यात त्यांच्या समवेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, गट विकास अधिकारी विशाल सिंह चौहाण, तालुका कृषी अधिकारी अशोक पिंपळगावकर, मा.नगराध्यक्ष फेरोज दोसाणी, कृषी अधिकारी अनिल जोंधळे, बंडू नाईक, माधवराव पाटील हडसणीकर, भगवानराव जोगदंड, नावेद खान, विनोद राठोड, कृषी सहाय्यक विनोद कदम इत्यादी सह कृषी व पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Intro:नांदेड : अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या ! - माजी आमदार प्रदीप नाईक

पंचानाम्याचे नाटक नको... सरसकट मदत जाहीर करा.. राज्यपाला कडे मागणी...

नांदेड : माहूर तालुक्यात २५ ऑक्टोबर पासून परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या ऐन काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापूस पिकांची झाडे कोसळून शेतकऱ्यांच्या हातातील खरिप हंगामाचा तोंडापर्यंत आलेला घास निघून गेला असताना प्रशासनातील अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर केवळ १० टक्के नुकसान झाल्याचे सांगून शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे.प्रचंड प्रमाणात अतीवृष्टी झाल्याने पंचनाम्याचे नाटक न करता सरसकट अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पिक विमा व शासकीय मदत द्या अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येची परवानगी द्या अशी मागणी मा.आ.प्रदीप नाईक यांनी केली आहे.माहूर तालुक्यातील शेती मालाच्या नुकसान भरपाई बाबत त्यांनी राज्याचे राज्यपाल यांना पत्र ही दिले आहे.Body:किनवट माहूर तालुक्यातील १ लक्ष ५ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड असून २५ ऑक्टोबर पासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पूर्ण पिक होत्याचे नव्हते केले आहे माहूर तालुक्यात १८ हजार हेक्टर क्षेत्रवर कापूस,१० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड केलेली पिकांचे ८० टक्के पर्यंत नुकसान झाले आहे.त्यामधील ५० टक्के पिके पूर्णतः उध्वस्त झाली आहेत तर किनवट तालुक्यात कापूस व सोयाबीनची ७७ हजार हेक्टर वर लागवड झालेली असून माहूर व किनवट तालुक्यात नुकसानीबाबत समान स्थिती आढळून आली आहे.
माजी आ.प्रदीप नाईक यांनी किनवट माहूर तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली असून तालुक्यातील मौजे हडसनी,दत्तमांजरी, वझरा, वानोळा, मेंडकी, मुंगशी, पाचोंदा, टाकळी, मुरली, लांजी,मेट,उमरा मदनापूर, हरडप, सावरखेड, वडसा, गोकुळ, आष्टा,पडसा आदी गावामध्ये पिक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देत नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार,व शासनाकडून हलगर्जीपणा होत असल्यास जनतेच्या खांद्याला खांदा लावून तीव्र जनआंदोलन करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा विश्वास शेतकऱ्यांना दिला.Conclusion: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत खरीप हंगाम घरात येण्याच्या तोंडावरच मोठे अस्मानी संकट आल्याने किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात झाली असली तर केवळ सत्तेचे राजकारण करणाऱ्या भाजपा व शिवसेना विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठ दिवस झाले असले तरी मुख्यमंत्री कुणाचा या मुद्द्यावरून एकमेकांशी भांडत असून शेतकऱ्यांच्या समस्याचे भाजपा-शिवसेनेला त्याचे कोणतेही सोयरसुतक असल्याचे दिसत नसून किनवट माहूर तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे माजी आ.प्रदीप नाईक यांनी शेतकरी व उपस्थित नागरिकांना बोलतांना सांगितले व वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पुढे बोलतांना नाईक यांनी दिला.पीक पाहणी दौर्यात त्यांच्या समवेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव,गट विकास अधिकारी विशाल सिंह चौहाण,तालुका कृषी अधिकारी अशोक पिंपळगावकर,मा.नगराध्यक्ष फेरोज दोसाणी,कृषी अधिकारी अनिल जोंधळे,बंडू नाईक, माधवराव पाटील हडसणीकर,भगवानराव जोगदंड, नावेद खान,विनोद राठोड,कृषी सहाय्यक विनोद कदम इत्यादी सह कृषी व पंचायत समिती कर्मचाऱ्यां चा समावेश होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.