ETV Bharat / state

नांदेडातून पाऊस बेपत्ता; जिल्ह्यातील ४० टक्के पेरण्या अद्याप बाकीच - farmers distressed

जिल्ह्यात चांगला पाऊस न झाल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिता ग्रस्त झाला आहे.

शेतकरी
author img

By

Published : Jul 14, 2019, 1:37 PM IST

नांदेड- जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. १४ जुलै पर्यंत सरासरीपेक्षा केवळ बारा टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे जवळपास ४० टक्के पेरण्या अद्याप बाकी आहेत. जिल्ह्यात पावसाने लवकर हजेरी न लावल्यास केलेल्या पेरण्या वाया जाणार असल्याचे चित्र आहे. दुबार पेरणी करावी लागणार की काय? या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

समस्या सांगताना शेतकरी

चांगला पाऊस पडेल या अपेक्षेने शेकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. अपेक्षीत पाऊस न पडल्याने जमिनीत पुरेशी ओल मुरली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हळद वाया गेली आहे. त्यातच पावसाअभावी उसाचे पीक देखील वाळून जात आहे. पावसाचा पत्ता नसल्याने नांदेड जिल्ह्याची वाटचाल दुष्काळाकडे होणार की काय,अशी शेतकऱ्यांकडून भीती व्यक्त केली जात आहे.

नांदेड जिल्ह्याला मृगनक्षत्राच्या पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेले उडीद आणि मुगाचे नुकसान झाले. काही प्रमाणात सोयाबीन कपाशीसह इतर पेरण्या झालेले पिक देखील पावसाअभावी धोक्यात आले आहेत. त्यामुळे पावसाने लवकर हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांना अजून नुकसान होण्याची शक्याता आहे.

Intro:नांदेड : बेपत्ता झालेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेत;
जिल्ह्यातील ७० टक्के पेरण्या अद्याप बाकीच.

नांदेड : जिल्ह्यात 14 जुलै पर्यंत सरासरीपेक्षा केवळ बारा टक्केच पाऊस झाला आहे.त्यामुळे जवळपास 70 टक्के पेरण्या अद्याप बाकीचं आहेतBody:आज ना उद्या चांगला पाऊस पडेल या अपेक्षेने शेकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. चांगला पाऊस न पडल्यामुळे जमिनीत ओल मुरलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हळद वाया गेली आहे. त्यातच पावसाअभावी उसाचे पीक देखील वाळून जात आहे. Conclusion:पावसाचा पत्ता नसल्याने नांदेड जिल्ह्याची वाटचाल दुष्काळाड़े होतेय की काय अशी भीती व्यक्त केल्या जात आहे. नांदेड जिल्ह्याला मृगनक्षत्राच्या पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेले उडीद आणि मुगाचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. काही प्रमाणात सोयाबीन कपाशीसह इतर पेरण्या झालेलं पिकं देखील पावसाअभावी धोक्यात आले आहेत.पावसाने दिलेल्या उघाडीमुळे जिल्हयातील शेतकरी मात्र मोठ्या चिंतेत पडला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.