नांदेड - महापौरपदासाठी गुरुवारी काँग्रेसच्या वतीने दीक्षा धबाले यांचाच एकमेव अर्ज दुपारी नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यामुळे आता त्यांचीच निवड होणार असून त्याची औपचारिकता बाकी राहिली आहे.
दुसरीकडे भाजपच्या बेबी गुपिले यांनीही अर्ज दाखल केला आहे. नांदेड महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेत महापौर शीला भवरे यांनी राजीनामा दिल्यामुळे महापौरपदासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत काँग्रेसतर्फे दीक्षा धबाले यांनी दोन अर्ज दाखल केले.
यावेळी महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, माजी महापौर शीला भवरे, दीक्षा धबाले, अब्दुल सत्तार, उपमहापौर विनय गिरडे पाटील, सभापती फारुख अली खान, माजी सभापती शमीम अब्दुल्ला, विलास धबाले, बापूराव गजभारे आदी उपस्थित होते. दुसरीकडे भाजपतर्फे बेबी गुपीले यांनी अर्ज दाखल केला आहे. आता शनिवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या शंकरराव चव्हाण सभागृहात पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे.