नांदेड Manoj Jarange : जालन्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील पत्र उत्तर सभागृहात मांडलं. तसंच निलंबीत पोलीस अधिकारी तसंच केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गुन्हे मागे न घेतल्यास 24 तारखेनंतर मराठा समाज काय आहे ते दाखवून देण्याचा सरकारला इशारा दिला आहे.
आरक्षण मिळण्याची चांगली संधी : मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू असून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आता आरक्षण मिळण्याची चांगली संधी आहे, आरक्षण न मिळाल्यास आम्ही दहा वर्षे मागे जाऊ, त्यामुळं समाजातील लोकांनी संघटित होऊन समाजाच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे, असं मत मनोज जरांगे पाटील यांनी नांदेड येथील सभेत बोलताना केलं.
काय म्हणाले फडणवीस? : देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणावर लेखी उत्तर सादर करताना सांगितलं की, या घटनेत सुमारे 50 आंदोलक, 79 पोलिस जखमी झाले आहेत. त्यामुळं या घटनेत बहुतांश पोलीस जखमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी बचावात्मक, समंजसपणे बळाचा वापर केला. त्यामुळं सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. या प्रकणातील सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असं देखील फडणवीस म्हणाले.
गुन्हे मागे घेण्यास असमर्थता : आंतरवली येथील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यास देवेंद्र फडणवीस यांनी या लेखी उत्तराद्वारे असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे त्यांनी आज हिवाळी अधिवेशनात सर्व प्रश्नांना लेखी उत्तरे देऊन एकप्रकारे पोलिसांना पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला. मात्र, त्यावेळी काही मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आंदोलकांवरील आरोप तातडीनं मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी केली आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील, असं आश्वासनही मनोज जरांगे यांना देण्यात आलं.
हेही वाचा -