ETV Bharat / state

Daheli Tanda Sarpanch : 25 वर्षांपासून सरपंच असूनही तोडसाम कुटुंबाचा मोलमजुरीवर उदरनिर्वाह

दहेली तांडा येथील रहिवासी रामदास तोडसाम यांच्याकडे मागील २५ वर्षांपासून सरपंचपद असूनही कुटुंब हालाकीच्या परिस्थितीत जगत आहे. आजही या कुटुंबियांतील सदस्य सालगडी, मोलमजूर म्हणूनच काम करत आहे.

Daheli Tanda Sarpanch
Daheli Tanda Sarpanch
author img

By

Published : Jun 23, 2023, 4:16 PM IST

रामदास तोडसाम आणि त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया

नांदेड : राजकारणात एखाद्याला पद मिळाले की त्याच्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट असते. पद मिळाल्यानंतर तो थाटात राहतो, तसा वागतो देखील, त्यातच सरपंचपद मिळाल्यानंतर त्याचा रुबाब तर पाहण्यासारखा असतो. मात्र, नांदेड जिल्ह्यातील एक कुटुंब या सगळ्यांना अपवाद ठरले आहे. मागील २५ वर्षांपासून एकाच घरात सरपंचपद असूनही कुटुंब हालाकीच्या परिस्थितीत जगत आहे. आजही या कुटुंबियांतील सदस्य सालगडी, मोलमजुरीचे काम करत आहे. त्यांना सरपंच पदाचा गर्व देखील नाही. मिळेल ते काम करुन कुटुंब उदरनिर्वाह करत जनतेची सेवा करतात. हे कुटुंब आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील दहेली तांडा या गावचे.

सरपंच असून सालगडी म्हणून काम : दहेली तांडा येथील रहिवासी रामदास तोडसाम यांची ही कहाणी आहे. तोडसाम कुटुंबातील सूनबाई सद्या दहेली तांडा येथील सरपंच आहेत. कुटुंबात रामदास तोडसाम यांचा पार्वतीबाई तोडसाम आणि दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. २५ वर्षापूर्वी रामदास तोडसाम आणि त्यांचे कुटुंबीय रोजगाराच्या शोधात दहेली तांडा येथे आले होते. तोडसाम कुटुंबीय आदिवासी परधान जातीत मोडतात. ते गावातील मोहन जाधव यांच्याकडे सलगडी म्हणून कामाला आहेत. आज देखील संपूर्ण कुटुंब सलगडी म्हणून काम करत आहेत. जनावरांना पाणी पाजवणे, चारा घालणे यासह शेतातील कामे देखील कुटुंबीय एकत्र करतात. त्या मोबदल्यात कुटुंबियांना वर्षात जवळपास एक लाख रुपये मिळतात.

सलग चारवेळा कुटुंबाकडे सरपंच पद : दहेली तांडा येथील सरपंचपद आदिवासी जातीसाठी आरक्षित होते. त्यामुळे तोडसाम कुटुंबातील सूनबाईची या पदावर वर्णी लागली आहे. दहेली तांडा हे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे गाव आहे. या गावात जवळपास दोन हजार लोकवस्ती आहे. बंजारा समुदाय येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. यात मुस्लिम कुटुंबीय देखील गावात राहतात. दहेली तांडा २५ वर्षापूर्वी दहेली गाव आणि दहेली तांडा ग्रामपंचायत वेगळी झाली होती. त्यानंतर दहेली ग्रामपंचायत सरपंचपद हे आदिवासी समाजासाठी आरक्षित सुटले होते. त्यामुळे आदिवासी समाजाचे एकमेव कुटुंब असल्याने रामदास तोडसाम यांना सरपंच पदाची संधी मिळाली. त्यानंतर सलग चारवेळा सरपंच पद हे आदिवासी समाजासाठी कायम राहिले. रामदास तोडसाम हे दहा वर्ष सरपंच तर, त्यांची पत्नी पार्वतीबाई तोडसाम ह्या पाच वर्ष सरपंच होत्या. त्यानंतर त्यांचा मुलगा राजेंद्र तोडसाम हे पाच वर्ष आणि आता त्यांची सुनबाई मनीषा जयवंत तोडसाम सरपंच म्हणून काम पाहत आहेत. या ग्राम पंचायतीत ९ सदस्य आहेत.

पत्र्याच्या घरात तोडसाम कुटुंबियांचे वास्तव्य : पत्र्याच्या घरात तोडसाम कुटुंबियांचे वास्तव्य आहे. एखाद्याला सरपंचपद मिळाल्यानंतर त्याच्या राहणीमानात बदल होतो. सरपंचपद आल्यानंतर चारचाकी सोबतच घर देखील राजकारण्यांचे आलिशान असतात. मात्र, तोडसाम कुटुंबियांनी २५ वर्ष सरपंच पदाचा उपभोगत घेऊनही ते आजही मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करत आहेत. एवढच नाही तर, पत्राच्या घरात त्यांचे आजही वास्तव्य आहे. घरात सरपंच पद असूनही त्यांना घरकुलचा लाभ मिळालेला नाही. शासनाने घरकुलचा लाभ द्यावा, अशी विनंती तोडसाम कुटुंबीय करीत आहेत. गावाचा विकास झाला आहे. मात्र, सरपंच असून ही कुठल्याच योजनेचा कुटुंबीयांनी स्वता:साठी लाभ घेतला नाही.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.