नांदेड वॉईन मार्टमध्ये बियर खरेदीसाठी आलेल्या आणि पाहिजे असलेली बियर मिळाली नाही. Nanded Crime त्या रागाच्या भरात वाईन मार्टमध्ये घुसून दिवसाढवळ्या मॅनेजरची हत्या करण्यात Killing manager in broad daylight आल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून गुंडागर्दी आणि दादागिरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सिडकोतील ढवळे कॉर्नर मुख्य रस्त्यावर प्रदीप वाईन मार्ट आहे. या ठिकाणी काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक युवक बियर घेण्यासाठी आला होता. पण तो मागत असलेली बियर त्याला वाईन मार्टवर मिळाली नाही. त्याचा राग मनात ठेऊन बियर नसेल तर दुकान बंद करा म्हणत. या युवकाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण यानंतर तासाभराने साडेनऊ वाजता तोच युवक अन्य 4 ते 5 जणांसोबत दुकानात आला. त्यानंतर दुकानाचे लोखंडी गेट जबरदस्तीने उघडून वाईन मार्टमधील दोघा कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. तर यावेळी वाईन मार्टमध्ये मॅनेजर असलेल्या युवकाला जबरदस्तीने बाहेर काढून त्याच्या बरगडीत खंजीर खुपसण्यात आला. Nanded has been murder to death त्यावेळी मॅनेजर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोरांनी दुचाकीवरून पोबारा केला आहे.
मॅनेजर वाकोरे यांना तात्काळ रुग्णालयात दखल करण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यापासून केवळ 500 मीटरवर असलेल्या ठिकाणी मुख्य चौरस्त्यावर घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मॅनेजरला मारहाण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस स्थानकाजवळच हत्या मॅनेजर वाकोरे यांना तात्काळ रुग्णालयात दखल करण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यापासून केवळ 500 मीटरवर असलेल्या ठिकाणी मुख्य चौरस्त्यावर घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मॅनेजरला मारहाण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
नांदेडमध्ये गुंडांचा हैदोस नांदेडमध्ये सध्या गुंडांचा हैदोस वाढल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. पोलीस ठाण्याजवळ आणि तेही प्रचंड वर्दळीच्या रस्त्यावर ही हत्या झाल्याने व्यापारी वर्गातून दहशत निर्माण झाली आहे. कोणतेही मोठे कारण नसताना केवळ बोलण्याच्या रागातून इतकी क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने नांदेडमधील सिडको भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
खासदारांच्या पुतण्याचे दुकान हत्या झालेले वाईन शॉप हे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुतण्याचे आहे, असे असतानाही गुंडांची दुकानात जाऊन मारहाण आणि हत्या करण्यात आल्याने नांदेडमध्ये पोलिसांचा धाक राहिला नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच सवाल मागच्या वर्षभरापासून नांदेडमध्ये घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नीट उकल करण्यात नांदेड पोलिसांना यश आलेले नाही. याउलट जिल्ह्यात मटका जुगारासह अनेक अवैध धंदे मात्र राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे पोलीस नेमकं करतात तरी काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा Devendra Fadnavis मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का ? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं