ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात 12 जुलै ते 20 जुलै दरम्यान संचारबंदी - nanded corona updates

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात १२ ते २० जुलै दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी आज आदेश निर्गमित केले आहेत.

नांदेड जिल्ह्यात 12 जुलै ते 20 जुलै दरम्यान संचारबंदी

author img

By

Published : Jul 10, 2020, 6:18 PM IST

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात उक्त विषाणूची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून १२ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते २० जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी आज(शुक्रवार) आदेश निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याकरता खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यात अटी व शर्तीची संचारबंदी आवश्यक असल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने १२ ते २० जुलै दरम्यान लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमधून सर्व शासकीय कार्यालय, त्यांचे कर्मचारी, वाहन तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. सर्व शासकीय व खाजगी रुग्णालय, औषधी दुकान, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय अत्यावश्यक सर्व सेवा तसेच पशुवैद्यकीय दवाखाने व औषधालय, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रानिक मिडियाचे वार्ताहर, प्रतिनिधी, वर्तमान पत्र वितरक यांना घरपोच वर्तमान पत्र वाटपासाठी मुभा देण्यात आली आहे. तसेच, अनेक अटी व शर्तीला अनुसरुन संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.