ETV Bharat / state

किनवट, माहुर तालुक्यात ओला दुष्काळ; ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे - nanded heavy rainfall

गेल्या ५ दिवसांपासून पावसाने माहुर तालुक्यात धुमाकूळ घातल्याने सोयाबीन, कापूस पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट असून बळीराजावर आर्थिक नुकसानीचे संकट कोसळले आहे.

किनवट, माहूर तालुक्यात ओला दुष्काळ
author img

By

Published : Oct 29, 2019, 2:45 PM IST

नांदेड - गत आठवड्यापासून माहुर तालुक्यात परतीच्या पावसाने रिमझीम सुरुवात केली होती. मात्र, गेल्या ५ दिवसांपासून पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातल्याने सोयाबीन, कापूस पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट असून बळीराजावर आर्थिक नुकसानीचे संकट कोसळले आहे. तरी, शासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

किनवट, माहूर तालुक्यात ओला दुष्काळ

माहूर, किनवट तालुके हे डोंगराळ भागात वसले असून येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तालुक्यात शेती पुरक उद्योग व्यवसायाला चालना देण्यास प्रशासन उदासीन असल्याने आणि शेतीला जोड धंद्याची साथ नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची आहे. तर, तालुक्यात सिंचनाची व्यवस्था अल्प असून तीही हंगामी आहे. त्यामुळे शेतकरी यांची भिस्त केवळ निर्सगावर अवलंबून असलेल्या खरीप हंगामावरच विसंबून आहे. मागील ३ ते ४ वर्षांपासून पीके ऐन उमेदीत असतानाच निसर्गाच्या प्रकोपामुळे नुकसान होत असल्याने शेतकरी डबघाईला आला आहे. या चालू वर्षात सुरुवातीला पाऊस समाधानकारक पडत असल्याने सुगीचे दिवस येतील, अशी आशा बळीराजास वाटत होती. मात्र, मागच्या आठवड्यापासून तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे कापणीस आलेल्या सोयाबीन पिकांच्या शेंगाना अंकुर फुटले असून वेचणीस आलेल्या कापसाच्या पिकास मोड फुटत आहेत. तर, परीपक्व बोंडे अती पावसामुळे खराब होत आहेत. त्यामुळे खरीपातील पिकांच्या उत्पादनात मोठी घट येऊन प्रचंड नुकसान होत आहे. ऐन दिवाळीच्या सणावर आलेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे दिवाळे काढले असल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच तत्काळ नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

मजुरांची उपासमार -

गेल्या आठवड्यापासून तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असल्याने दरडोई मजुरी केल्याशिवाय चूल पेटत नसलेल्या शेतमजुरांच्या हाताला काम नाही. यामुळे ऐन दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसात शेतमजुरांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. तर, शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असून याचा फटका व्यापारी वर्गावर पडला आहे. वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीच्या दिवसात शेतमजुरावरांवर आर्थिक संकट ओढावल्याने माहुर शहरातील व्यापार पेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप वाया; शेतकरी आर्थिक अडचणीत

हेही वाचा - गावाला जाऊ दिले नाही म्हणून १३ वर्षीय मुलीची आत्महत्या

Intro:नांदेड : किनवट माहूर तालुक्यात ओला दुष्काळ.

नांदेड : गत आठवड्यापासुन माहुर तालुक्यात परतीच्या पावसाने रिमझीम सुरूवात केली. पण गत पाच दिवसा पासुन पावसाने तालुक्यात धुमाकुळ घातल्याने सोयाबीन, कापूस पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत असुन यांच्या वर आर्थिक नुकसानीचे संकट कोसळले असल्याने शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. Body:
माहूर किनवट हा तालुका डोंगराळ भागात वसला असुन येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेतीच आहे तालुक्यात शेती पुरक उद्योग व्यवसायासाठी चालना देण्यास प्रशासन उदासीन असल्याने शेतीस जोड धंद्याची साथ नसल्याने शेतकऱ्यांची परीस्थिती हलाखीची आहे. तर तालुक्यात सिंचनाची व्यवस्था ही अल्प असुन ती ही हंगामी आहे .त्यामुळे शेतकरी यांची भिस्त केवळ निर्सगावर अवलंबून असलेल्या खरीप हंगामावरच विसंबून आहे.गत तीन ते चार वर्षा पासून निसर्गाच्या लहरी पणामुळे पिक ऐन उमेदीत असतानाच निसर्गाच्या प्रकोपामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी डबघाईत आला आहे.चालु वर्षात सुरूवातीला पाऊस समाधान कारक पडत असल्याने सुगीचे दिवस येतील अशी आशा बळीराज्यास वाटत होती.Conclusion:मात्र गत आठवड्या पासून तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातल्याने कापनीस आलेल्या सोयाबीन पिकांच्या शेंगाना अंकुर फुटले असुन वेचणीस आलेला कापुस पिकास मोड फुटत आहे तर परीपक्व बोडे अती पावसामुळे खराब होत आहे त्या मुळे खरीपातील पिकांच्या उत्पादनात मोठी घट येऊन प्रचंड नुकसान होत असल्याने ऐन दिवाळीच्या सणावर आलेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे दिवाळे काढले असुन शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला असुन तात्काळ नुकसान भरपाई ची मागणी करीत आहे.
- मजुरांची उपासमार
गत आठवड्या पासून तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असल्याने दरडोई मजुरी केल्या शिवाय चूल पेटत नसलेल्या शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात उपास मारीची वेळ ओढावत असुन आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असुन याचा फटका व्यापारी वर्गावर पडला आहे वर्षात सर्वात मोठा असलेल्या दिवाळी सणासुदीच्या दिवसात जगाच्या पोशिंद्यावर व शेतमजुरावर आर्थिक संकट ओढावल्याने माहुर शहरातील व्यापार पेठेत शुक शुकाट दिसुन येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.