ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

author img

By

Published : Feb 19, 2021, 5:30 PM IST

बुधवारी मध्यरात्रीनंतर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. अवेळी झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या पावसामुळे गहू, हरभरा, हळद, कापूस तसेच टरबूज, पपई, टोमॅटो, फुलकोबी, कांदा आणि पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

नांदेड - बुधवारी मध्यरात्रीनंतर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. अवेळी झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या पावसामुळे गहू, हरभरा, हळद, कापूस तसेच टरबूज, पपई, टोमॅटो, फुलकोबी, कांदा आणि पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंब्याच्या मोहोरालाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तसेच वीज पडून दोघांचा मृत्यू देखील झाला.

वीज पडून दोघांचा मृत्यू

१७ ते २० फेब्रुवारी दरम्यान मराठवाड्यातील विविध भागात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अवकाळी पावसासह काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. किनवट व नायगाव तालुक्यात दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा

जिल्ह्यात मागील दोन दिवसात अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. अजूनही ढगाळ वातावरण आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसला आहे.

रब्बीच्या पेरणीत मोठ्या प्रमाणात वाढ

जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्यामुळे यंदाच्या वर्षी रब्बीच्या पेरणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जिल्ह्यात जवळपास तीन लाख १४ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली. यात सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा पेरला आहे. यासोबतच गहू, करडई, रब्बी ज्वारी तसेच फळपिकांचा समावेश आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.