ETV Bharat / state

निजामुद्दीन 'मरकझ'हून नांदेडात दाखल झालेल्या 'त्या' विदेशी धर्म प्रचारकांविरूध्द गुन्हे दाखल - विदेशी मुस्लीम धर्मप्रचारक

दिल्ली येथील तबलिगी जमातच्या इस्तेमाला हजेरी लावून नांदेड शहरात गेल्या 15 मार्चपासून वास्तव्यास असलेल्या इंडोनेशियातील 10 नागरिकांसह दिल्ली येथील दोघांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मरकझ नांदेड
तबलिगी जमातच्या दहा विदेशी नागरिकांवर नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
author img

By

Published : Apr 8, 2020, 12:40 PM IST

नांदेड - दिल्ली येथील तबलिगी जमातच्या इस्तेमाला हजेरी लावून नांदेड शहरात गेल्या 15 मार्चपासून वास्तव्यास असलेल्या इंडोनेशियातील 10 नागरिकांसह दिल्ली येथील दोघांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व लोक 2 मार्च ते 8 मार्च हजरत निजामुद्दीन नवी दिल्ली येथील मरकज कार्यक्रमात हजर होते. नांदेडला आल्यावर त्यांनी आपण त्या कार्यक्रमात होतो, ही बाब लपवून जिल्हा प्रशासनाची दिशाभूल केल्याने त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांचा व्हिसा रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी माहिती दिली आहे.

तबलिगी जमातच्या दहा विदेशी नागरिकांवर नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेही वाचा... 'मरकझ'ला गेल्याचे लपवल्यामुळे सहा विदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल..

इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक बाळू गिते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 एप्रिल रोजी त्यांना पोलीस नाईक शिवसांभ मारवाडे, निहरकर आणि शेख इमारान यांनी ही माहिती दिली की, इंडोनेशियातील दहा नागरिक ज्यात 5 पुरुष आणि 5 महिला तसेच दिल्ली येथील पती-पत्नी असे 12 जण 15 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत नांदेड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास आहे.

त्या सर्वांची पोलिसांनी स्वॅब तपासणी केली. त्यात सध्या ते डॉक्टारांच्या निगराणीखाली आहेत.या सर्वांचे पासपोर्ट, व्हिसा 2020 ते 2024 पर्यंत प्रत्येकाचे वेगवेगळ्या वर्षात वैध आहेत. या सर्वांनी दिलेल्या माहितीनुसार 2 मार्च ते 8 मार्च ते मरकजमध्ये राहिले. 9 मार्च रोजी जुनी दिल्ली येथील कुवा मस्जिदमध्ये राहिले. 10 मार्च रोजी अजून एकाच्या घरी थांबवले आणि 11 मार्च रोजी जुनी दिल्ली येथील दुसर्‍या जागी राहिले. 13 मार्च पर्यंत ते असेच वेगवेगळ्या ठिकाणी राहिले.

हेही वाचा.... कोरोनाचा कहर : राज्यात 150 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा हजारावर अन् मृतांची संख्या 64

निजामुद्दीन रेल्वे स्टेशन येथून ही सर्व मंडळी रेल्वेने नांदेडकडे निघाली. ते 15 मार्च रोजी सकाळी 7 वाजता नांदेडला पोहचले. नांदेडमध्ये 15 ते 19 मार्च हिलालनगर येथे थांबले. 19 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान हे सर्व विदेशी नागरीक अन्य व्यक्तीच्या घरी थांबले. 3 ते 4 एप्रिल दरम्यान रहेमतनगर येथे थांबले. या सर्व लोकांच्या मोबाईलचे सी.डी.आर आणि एस.डी.आर. तपासले असता त्यांनी जमावबंदी व संचारबंदी आदेश असताना एका ठिकाणी न थांबता 5 पेक्षा जास्त लोक एकत्र जमून वेगवेगळ्या ठिकाणी संचार करत होते.

या विदेशी व्यक्तींनी कायद्याचे उल्लंघन आहे. म्हणून इतवारा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील, पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पठाण यांच्याकडे देण्यात आला आहे.

या धर्मगुरूंविरोधात गुन्हा दाखल करू नये यासाठी रविवारी रात्री मोठा जमाव जमला होता. या जमावाने एकजूट दाखवत पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्‍न केला. मात्र, पोलिसांनी धर्मगुरूंवर गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.