ETV Bharat / state

कोरोनासह इतर आजारांमुळे मृतांच्या संख्येत वाढ; स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रांग..! - नांदेड कोरोना अपडेट

नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील मृत रुग्णांचे गोवर्धन घाटावरील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. त्यामुळे गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाईन लागली होती. स्मशानभूमीच्या गेटपासून सरण रचून अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे दिसून आले.

नांदेड
नांदेड
author img

By

Published : Mar 26, 2021, 8:01 PM IST

नांदेड - कोरोना फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला असून आता मृतांची संख्याही वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील मृत रुग्णांचे गोवर्धन घाटावरील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. त्यामुळे गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाईन लागली होती. स्मशानभूमीच्या गेटपासून सरण रचून अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे दिसून आले.

कोरोनासह इतर आजारांमुळे मृतांच्या संख्येत वाढ

नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. मात्र, मागील काही दिवसात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नांदेडकरांची चिंता वाढली आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने टाळेबंदी घोषित केली आहे. 24 मार्च पासून 4 एप्रिलपर्यंत ही टाळेबंदी असणार आहे. या काळात सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

स्मशानभूमी बाहेर अंत्यविधीसाठी रांगा..!

मागील तीन दिवसात जिल्हाभरात 9 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत, तर इतर आजारांमुळे देखील दगावलेल्या रुग्णांमुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी बाहेर रांग लागली आहे. कोरोनामुळे नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत 683 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नांदेडात कोरोनाची दहशत पसरली आहे.

शासकीय यंत्रणेवर ताण-

गोवर्धन घाट स्मशानभूमीत लोखंडी स्टँडची संख्या कमी आहे. त्यातच अचानक मृतांची संख्या वाढल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे स्मशानभूमीच्या आवारात लाकडे रचून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करावे लागले. कोरोनामुळे नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत 683 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र आणि पोलिसांची नाहरकत आल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. महापालिकेच्या कर्मचा-यांकडून सर्व खबरदारी घेऊन अंत्यसंस्कार केले जात आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवर ताण आल्याचे पाहायला मिळाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.