ETV Bharat / state

विडा रंगेना! कोरोनाचा पान उत्पादक शेतकऱ्यांना फटका

जिल्ह्यातील चाभरा (ता.अर्धापूर) येथील शंकरराव मरकुंदे यांनी दोन एकर क्षेत्रावर पान नागवेलीची लागवड केली आहे. नागवेलीपासून वार्षिक लाखो रुपयांचा फायदा होतो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केल्याने बाजारपेठा बंद आहेत.

कोरोनाचा पान उत्पादक शेतकऱ्यांना फटका
कोरोनाचा पान उत्पादक शेतकऱ्यांना फटका
author img

By

Published : Apr 6, 2020, 1:12 PM IST

नांदेड - जेवण झाले की अनेकांना पान खाल्ल्याशिवाय जेवण झाल्याचे समाधानच वाटत नाही. पण या पानाचा विडा मात्र लॉकडाऊनमुळे रंगतच नाही. कोरोनाचा फटका इथेही बसल्याची खंत पान उत्पादक शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. उन्हाळयात पान वेलीच्या मळ्यातून भरघोस उत्पन्न मिळत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प असल्याने पान वेलीच्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कोरोनाचा पान उत्पादक शेतकऱ्यांना फटका

जिल्ह्यातील चाभरा (ता.अर्धापूर) येथील शंकरराव मरकुंदे यांनी दोन एकर क्षेत्रावर पान नागवेलीची लागवड केली आहे. नागवेलीपासून वार्षिक लाखो रुपयांचा फायदा होतो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केल्याने बाजारपेठा बंद आहेत. शंकरराव मरकुंदे यांनी दोन एकर क्षेत्रात कपुरी जातीच्या पानवेलीची लागवड केली आहे. कपुरी पानाला श्रीरामपूर, परभणी, जळगाव, नाशिक अशा मोठ्या शहरात मागणी असते. कोरोना विषाणूच्या भीतीने सर्व बाजारपेठा बंद असल्याने पानांची मागणीच होत नाही. त्यामुळे कुठलीच विक्री नाही.

पान मळ्यात दररोज दहा ते बारा मजूर कामाला असतात. या कामातून मजुरांचे कुटुंब अवलंबून असते. मात्र, सध्या त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यात पाने तोडण्यासाठी असंख्य मजुरांना बाराही महिने काम मिळत असते. उन्हाळ्यात लग्न सराईमुळे पान शौकिनांची संख्या अधिकची असते. त्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होतो. मात्र, यंदा पाने जाग्यावरच पडून आहेत. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना ऐन उन्हात दिलासा देणारे एकमेव पीक म्हणून पान मळ्याकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांना पानवेलीच्या माध्यमातून बाराही महिने उत्पादन मिळते.

गेल्या दोन महिन्यांपासून पान तोडण्यास सुरुवात झाली होती. लग्नसराईमध्ये पानाला मागणी वाढण्याची शक्यता होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आणि देशात लॉकडाऊन केल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया पान उत्पादक शेतकरी शंकरराव मरकुंदे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.