नांदेड - बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी या गावात पिण्याच्या पाण्याच्या शोधात आलेल्या वानरचे ( Monkeys search drinking water ) मुंडके एका तांब्यात ( monkey head stuck in copper) अडकले. औरंगाबाद वन विभागाच्या रेस्क्यू टिमने ( Aurangabad Forest Department Rescue Squad ) अथक प्रयत्नानंतर वानराच्या डोक्यात अडकलेल्या तांब्या ( Copper stuck monkey head ) यशस्वीरित्या काढला. वन परिक्षेत्र देगलूर अंतर्गत येणाऱ्या बिलोली तालुक्यातील पाचे येथे १७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता वानराचे पिल्लू ( Monkey puppies ) पिण्याच्या पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत आले होते. वानराला एका तांब्यात पाणी दिसल्यने ( monkey saw water copper ) त्याने पाणी पिण्याता प्रयत्न केला. मात्र, पाणी पितांना त्याचे डोके तांब्यात अडकले. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती देगलूर वन परिक्षेत्र विभागाच्चा अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. वन विभागाच्या कर्मच्याऱ्यांनी वानराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हाती वानर लागले नाही.
शेवटी औरंगाबाद वनविभागाच्या टिमला घटनास्थळी पाठवण्यात आहे. त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर वानराच्या पिलास सायंकाळी 7 वाजता पकडण्यात यश आले. वानराच्या डोक्यात अडकलेला तांब्या टिमने यशस्वीपणे बाहेर काढला. मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, नांदेडने उपवनसंरक्षक केशव बाबळे, नांदेडचे सहाय्यक वनसंरक्षक भीमसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र देगलूर (प्रा) अधिकारी सागर हराळ निखिल हिवरे हे वनपाल एस.एस. गेडाम, शेख फरीद तसेच वनरक्षक गजानन कलवार, गिरीश कुरुडे, ज्ञानेश्वर मुसळे, कैलास होनशेटे, माधव कुमारे, लक्ष्मण शिंदे, मारोती पानगटवार व वनमजूर गायकवाड, चव्हाण, बालाजी बत्तलवाड औरंगाबाद येथील रेस्क्यू टीमचे कर्मचारी प्रकाश सूर्यवंशी, एस. के. गुसिंगे, विश्वास साळवे व पी.एम. अहिरे यावेळी वन विभागाचे कर्मच्यारी तसेत अधिकारी उपस्थित होते.