नांदेड - कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून बाधितांची संख्या २६२ वर पोहोचली आहे. यामुळे कंटेन्मेंट झोन्समध्ये वाढ झालीय. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन झोनप्रमुख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी केले आहे. सध्या शहरात 40 कंटेनमेंट झोन्स आहेत.
दररोज नवनव्या परिसरातून पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी कन्टेन्मेंट झोन्स मधील नियम आणखी कडक केले आहेत. या झोनमध्ये नागरिकांनी काळजी घेणे हा एकमेव पर्याय असल्याचे सांगण्यात आले.
अबचलनगर, अंबानगर सांगवी, लंगरसाहिब गुरुद्वारा, रहेमतनगर, करबला रोड, कुंभार टेकडी, स्नेहनगर पोलीस कॉलनी, लोहार गल्ली विवेकनगर, इतवारा, मिल्लतनगर, जिजामाता कॉलनी, जोशी गल्ली या भागांत नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागात देखील पाच कंटेन्मेंट झोन नव्याने तयार झाले आहेत.
तसेच शिवाजीनगर, नई आबादी, रहमान हॉस्पिटल, देगलूर नाका प्लॉट, लेबर कॉलनी, उमर कॉलनी, गुलजार भाग, हनुमान मंदिर इतवारा, आर्य विहार आप्पा विद्युतनगर बस स्टॉपजवळ, सिद्धनाथ पुरी, लहुजीनगर वाघाळा, कृष्णामाई अपार्टमेंट तरोडा खुर्द, संभाजी चौक सिडको, अलीनगर खोजा कॉलनी, भगवान कॉलनी हनुमान मंदिर समोर इतवारा, समीराबाग बरकतपुरा परिसर, सोमेश कॉलनी, झेंडा चौक यांसह ४० प्रतिबंधित क्षेत्रांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त माहूर किनवट, देगलूर, मुखेड, मुदखेड, तालुक्यातही प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढली आहे.