नांदेड - येथील गुरुद्वारा बोर्डचे अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांच्याकडून पदाचा गैरवापर होत असून त्यांनी केलेल्या गैरवापराची सखोल चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जगदिपसिंघ नंबरदार यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
गुरविंदरसिंघ वाधवा हे यापुर्वी जनसंपर्क अधिकारी या पदावर कार्यरत होते. 30 मार्च 2018 च्या बैठकीत त्यांची अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज केला होता. परंतु, त्या उमेदवारांना न घेता वाधवा यांची नियुक्ती करण्यात आली. गुरविंदरसिंघ वाधवा यांना बोर्डने राहण्यासाठी तीन रुम दिले आहेत, असे असताना वाधवा यांनी वरिष्ठांची दिशाभल करून त्या रुमवर 7 लाखांचा खर्च केला आहे.
त्यातच आपल्या कुटुंबातील सदस्यांना बोर्डाच्या शाळेत थेट प्रिन्सिपलपदी नियुक्ती दिली आहे. कोणतीही जाहिरात न देता ही नियुक्ती करण्यात आली आहे. यासह अनेक कामे त्यांनी पदाचा गैरवापर करून केली असून त्यांची सखोल चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जगदिपसिंघ नंबरदार यांनी केली आहे. याबाबत गुरविंदरसिंघ वाधवार यांच्याशी संर्पक साधला असता तो होऊ शकला नाही.