नांदेड CM Eknath Shinde Phone : मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हदगाव तालुक्यातील हडसनी येथील दत्ता पाटील हडसनीकर यांनी देखील उपोषण सुरू केलंय. मागील सात दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरुय. त्यांची प्रकृती खालवल्याने दत्ता पाटील यांना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या माध्यमातून हडसनीकर यांच्याशी फोनवरुन संवाद साधलाय.
उपोषण मागं घेण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती : आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बैठका देखील सुरू आहेत. तेव्हा उपोषण मागं घ्यावं, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हडसनीकर यांना केलीय. मात्र, हडसनीकर यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिलाय. दरम्यान दत्ता पाटील हडसनीकर यांनी यापूर्वी देखील जुलै महिन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण केलं होतं (Eknath Shinde phone conversation hunger striker).
११ मराठा बांधवांचं उपोषण : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. उपोषण मागे घेण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या या उपोषणाला समर्थन देण्यासाठी तसंच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील ११ मराठा बांधवांनी उपोषण सुरू केलंय. अर्धापूर, हदगाव, कंधार, नायगाव या तालुक्यात मराठा बांधवाचं उपोषण सुरुय. 7 ते 8 जणांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान यातील एका उपोषणकर्त्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन संवाद साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केलीय (hunger strike Nanded for Maratha reservation).
उपोषण सुरु : दत्ता पाटील हडसनीकर ( हडसनी ता. हदगाव), सतिश पाटील हिप्परगेकर, गजानन पाटील हिप्परगेकर ( ता.नायगाव), हनुमंत बालाजी ढगे (वजीरगाव ता.नायगाव), संभाजी पाटील गोंधळे, नामदेव पाटील डाकोरे (पेठवडज ता.कंधार), आकाश पाटील कल्याणकर ( ता.कंधार), जयवंत कदम, स्वप्नील कदम, संतोष कदम, आकाश शिंदे (धामदरी ता.अर्धापूर) या उपोषणकर्त्यांचं उपोषण सुरुय.
मराठा आरक्षणाचा प्रश्न : दत्ता पाटील हडसनीकर यांच्यासह सात ते आठ जणांची प्रकृती खालावली आहे. उपोषण मागं घेण्यासाठी प्रशासनाकडून विनंती देखील केली जातेय. दरम्यान शनिवारी लोहा तालुक्यातील डेरला येथील संपूर्ण ग्रामस्थ गावात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती समोर येतेय. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा या उपोषणकर्त्यांनी घेतलाय.
हेही वाचा :