ETV Bharat / state

कोरोना रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्यासाठी येणार मर्यादा? शासकीय तंत्रनिकेतन व उर्दूघरामध्ये कोविड केअर सेंटर

महानगरपालिका क्षेत्रात कोविडचा वाढता संसर्ग आणि मृत्यूचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता सोमवारपासून ( दि .२९ ) पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णांना मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली. महसूल भवन कोविड सेंटरमध्ये सध्या जागा उपलब्ध असून शासकीय तंत्रनिकेतन तसेच उर्दूघर कोविड सेंटर सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

author img

By

Published : Mar 28, 2021, 3:33 PM IST

नांदेड कोरोना अपडेट  नांदेड कोरोना केअर सेंटर  उर्दूघर नांदेड
covid center

नांदेड - शहरातील लोकांचे राहणीमान लक्षात घेता बाधित रुग्णांसाठी एखादी स्वतंत्र खोली राहत असल्याने बाधितांना गृहविलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु बाधितांची संख्या सातत्याने वाढत चालल्यामुळे त्याचा इतरांना धोकाही होऊ लागला. कुटुंबात कमी प्रतिकार शक्ती असलेले लोक, वृद्ध नागरिक तसेच लहान मुलांना संसर्गाची शक्यता वाढत चालली होती. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने गुंडाळलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासकीय तंत्रनिकेतन व उर्दूघरामध्ये कोविड केअर सेंटर -

महानगरपालिका क्षेत्रात कोविडचा वाढता संसर्ग आणि मृत्यूचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता सोमवारपासून ( दि .२९ ) पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णांना मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली. महसूल भवन कोविड सेंटरमध्ये सध्या जागा उपलब्ध असून शासकीय तंत्रनिकेतन तसेच उर्दूघर कोविड सेंटर सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

एकट्या नांदेड शहरातील 10 हजारच्या वर रुग्ण -

गतवर्षी कोविडचा मोठा प्रादुर्भाव झाल्यानंतर एनआरआय यात्रीनिवास व पंजाब भवन ही दोन प्रमुख कोरोना केअर सेंटर होती. प्रादुर्भाव कमी झाला तशी ही दोन्ही केंद्रे बंद करण्यात आली. महसूल भवन हे एकच कोविड सेंटर सुरू होते. दुसऱ्या लाटेत गेल्या महिनाभरात १५ हजाराचा आसपास रुग्ण आढळले असून यातील १० हजाराहून अधिक रुग्ण एकट्या नांदेड शहरातील आहेत.

केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध -

ज्यांना संसर्गाची शक्यता असू शकते, अशांना कोविड केअर सेंटरमुळे चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. कोरोना झालेल्या रुग्णांस उपचाराची सुविधा तसेच इतरांची अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने कोविड सेंटर उपयुक्त ठरणार आहे. त्या ठिकाणी डॉक्टर आणि देखरेख करण्यासाठी आरोग्य सेवक राहणार असल्याने वेळेवर औषधी, ऑक्सीजन आणि तापाची तपासणी तसेच गरज भासल्यास निवासी उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.

कोविड सेंटरमध्ये पॉझिटीव्ह रुग्णांना भरती करण्यात येणार असल्याने यापुढे गृहविलगीकरणाचा पर्याय आता सोपा राहिलेला नाही. कुटुंबातील व्यक्ती व त्यांच्या आजाराची पार्श्वभूमी जाणून घेतल्याशिवाय गृहविलगीकरणाला मर्यादा येऊ शकतात. महिलांच्याबाबतीत काहीसे सैल धोरण आखले जाईल, अशी शक्यता दिसून येत आहे.

महसूल भवनमधील सध्या दीडशे ते दोनशे रुग्णांवर देखरेखीची सुविधा आहे. यातील एक इमारत केवळ महिला रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ९० खोल्या उपलब्ध असून तेथे २०० हून अधिक कोविडग्रस्तांना थांबण्याची सुविधा आहे. उर्दूघर सभागृहात दीडशे ते दोनशे रुग्ण क्षमता आहे. तथापि तेथील क्षमता ४०० पर्यंत वाढवता येईल, असे मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले.

हेही वाचा - राज्यात शनिवारी तब्बल 35 हजार 726 कोरोनाबाधितांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.