ETV Bharat / state

अर्धापूरच्या 'रासेयो'कडून ऐतिहासिक पर्यटनस्थळांची स्‍वच्‍छता - राष्ट्रीय सेवा योजना

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून ऐतिहासिक पर्यटनस्थळ केशवराज मंदिरासह परिसराची स्वच्छता करण्यात आली. अर्धापूर शहरास अति प्राचीन काळापासून ऐतिहासिक व संस्कृती वारसा लाभलेला आहे. आजचे अर्धापूर शहर हे एकेकाळी ' अराध्यपूर ' या नावाने  ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जायचे.

Cleaning of historical tourist places
ऐतिहासिक पर्यटनस्थळांची स्‍वच्‍छता
author img

By

Published : Dec 26, 2020, 9:18 PM IST

नांदेड - अर्धापूर शहरातील तीर्थक्षेत्र म्हणून मंजुरी मिळालेल्या ऐतिहासिक पर्यटनस्थळ केशवराज मंदिरासह परिसराची राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून स्वच्छता करण्यात आली. शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या युवकांनी श्रमदानातून देवालय परिसराची स्वच्छता करण्याचा यशस्वी उपक्रम राबविण्यात आला आहे.

अर्धापूर शहराला प्राचीन वारसा -

अर्धापूर शहरास अति प्राचीन काळापासून ऐतिहासिक व संस्कृती वारसा लाभलेला आहे. आजचे अर्धापूर शहर हे एकेकाळी ' अराध्यपूर ' या नावाने ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जायचे याचा पुरावा प्राचीन शिलालेखात सापडला आहे. या शहरात अनेक ठिकाणी प्राचीन मूर्ती, शिल्प, शिलालेख आहेत. त्यामुळे आजही येथील तीर्थक्षेत्र दर्जा असलेले केशवराज मंदिर त्याची साक्ष देत आहे.

अर्धापूर शहरासह तालुक्यातील हजारो हेक्टर शेत जमिन पैनगंगेच्या पाण्याने समृद्ध करण्याचे काम कै. डाॅ. शंकरराव चव्हाण यांनी केले आहे. तर प्राचीन काळामध्ये सुद्धा हे शहर नैसर्गिक दृष्ट्या पाण्याने समृद्ध शहर होते. असे वयोवृद्ध जाणकारांकडून सांगण्यात येते. विशेष म्हणजे या शहरातील प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये आड ( पाण्याची विहीर ) असल्याने येथे वैभवसंपन्न पाण्याची व्यवस्था होती. तसेच शहरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी ३२ एकर श्रेत्रफळ असलेला निजामकालीन पाझर तलाव उपलब्ध आहे. हा पाझर तलाव बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.

केशवराजची आकर्षक मूर्ती -

याच शहरात महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी केशवराज (विष्णूची दशावतार) ची मूर्ती आहे. त्यास केशव राजाचे मंदिर या नावाने ओळखले जाते. या परिसरास महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळाचा ' क ' दर्जा दिलेला आहे. या मूर्तीचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक इतिहासकार तज्ज्ञ अभ्यासक या स्थळास भेट देण्यासाठी येत असतात. तेथे उपलब्ध असलेल्या बाराव्या शतकातील शिलालेखाचा अभ्यास करण्यासाठी इतिहासकार या ठिकाणी येत असतात. अशा प्रकारे शहराचे ऐतिहासिक महत्त्व आहे.

श्रमदानातून परिसराची स्वच्छता..!

अशा या ऐतिहासिक पर्यटन स्थळ असलेल्या केशवराज मंदिर परिसरामध्ये मागील अनेक दिवसांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. या परिसरात ठिकठिकाणी झाडे, झुडुपे व गवत वाढले होते. काही नागरिक येथे जनावरे बांधत होते. त्यामुळे हा संपुर्ण परिसर अस्वच्छ झाला होता. हा परिसर स्वच्छ करण्यासाठी शंकराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाची सुरुवात केशवराजाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व नारळ फोडून करण्यात आला.

यावेळी संस्थांनचे अध्यक्ष प्रवीण देशमुख, प्रतिष्ठित नागरिक व्‍यंकटी राऊत तानाजी मेटकर, गोरखनाथ राऊत, शरद पतंगे, मनोज पतंगे, विठ्ठल शिनगारे, आदी मान्यवर उपस्थित होते. या बरोबरच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अमोल सरोदे निखील मोरे, अरविंद सोनटक्के, राजू सातव, सुरेश भालेराव, सदाशिव शिनगारे व कार्यक्रम अधिकारी डॉ. रघुनाथ शेटे यांची उपस्थिती होती. हे स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी अमोल सरोदे, अरविंद सोनटक्के, निखील मोरे, कैलास मोहिते, सुदेश भालेराव या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.