ETV Bharat / state

चारचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू, गावकऱ्यांचा रास्ता रोको - गावकऱ्यांचा रस्ता रोको

चारचाकीच्या धडकेत एका पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. चालकाला अटक करावी म्हणून गावकऱ्यांनी नांदेड-किनवट हा रस्ता बंद केला आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Feb 4, 2020, 3:40 PM IST

नांदेड - भरधाव चारचाकीच्या धडकेत पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी नांदेड-किनवट राज्यमार्गावर रास्तारोको केला आहे. घटनास्थळी हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक दाखल झाले असून गावकऱ्यांची समजूत काढून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत.

घटनास्थळ

अर्पिता सीताराम गुंडेकर (वय 5 वर्षे), असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी 11:30 च्या सुमारास हिमायतनगर तालुक्यातील सरसम गावाजवळ घडली आहे. अर्पिता ही चिमुकली अंगणवाडीतून आपल्या घराकडे निघाली होती. त्याच वेळी भरधाव चारचाकीने तिला जोरदार धडक दिली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा -तलवारीने हल्ला करत लुटले सोने, नांदेडला येत होते मित्र-मैत्रीण

या अपघातानातर चारचाकीचालकाने घटनास्थळावरून चारचाकी घेऊन पळ काढला आहे. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकलीला बघून संतप्त गावकरी रस्त्यावर उतरले. त्यानंतर नांदेड-किनवट राज्यमार्ग अडवत आंदोलन सुरू केलं आहे. अपघात केलेल्या चालकाला आणि चारचाकीच्या मालकाला तात्काळ अटक करून गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. नांदेड किनवट मार्गावरील वाहतूक तब्बल तीन तासांपासून रोखून धरल्याने या मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली आहे.

हेही वाचा - जिल्हा परिषदेत चारही सभापती काँग्रेसचेच; राष्ट्रवादीच्या हाती भोपळा....!

Intro:नांदेड : कार च्या धडकेत तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू.
- हिमायतनगर तालुक्यातील सरसम गावातील घटना.
- कार चालक व गाडी मालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी.
- किनवट नांदेड राज्यमार्गावर गावकऱ्यांचे ठिय्या.

नांदेड : भरधाव कारच्या धडकेत तीन वर्षीय चुमुकलीचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी नांदेड किनवट राज्यमार्गावर रास्तारोको केला आहे.घटनास्थळी हिमायतनगर पोलीस निरीक्षक दाखल झाले असून गावकऱ्यांशी समजूत काढून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत.Body:हिमायतनगर तालुक्यातील सरसम गावानजीक अर्पिता सीताराम गुंडेकर तीन वर्ष्याच्या बालिकेला भरधाव कारने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी 11:30 च्या सुमारास घडली आहे. अर्पिता ही चिमुकली अंगणवाडीतून आपल्या घराकडे निघाली होती त्याच वेळी भरधाव स्विफ्ट डिझायर कार ने तिला जोरदार धडक दिली त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.Conclusion: या अपघातांनातर कार चालकाने घटनास्थळावरून कार घेऊन पळ काढला आहे.घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकलीला बघून संतप्त गावकरी रस्त्यावर उतरून नांदेड किनवट राज्यमार्ग अडवून धरत आंदोलन सुरू केलं आहे.अपघात केलेल्या चालकाला आणि कारच्या मालकाला तात्काळ अटक करून गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. नांदेड किनवट मार्गावरील वाहतूक तब्बल तीन तासांपासून रोखून धरल्याने या मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.