नांदेड - राज्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी धाडी होत आहेत हे कारस्थान भाजपाचे आहे, असे महाविकास आघाडी सरकारकडून बोलले जात आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडे काही सापडायला नको ना? अनिल देशमुखांकडीव 340 कोटींची मालमत्ता जप्त झाली. मग काही नव्हतेच, तर मग हे सापडायला नको होते. ते माध्यमांशी बोलत होते.
जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आले होते. तेव्हा माध्यमांशी बोलतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, की अनिल देशमुखांना जामीन कोण फेटाळत आहे?
हेही वाचा-aryan drug case : ड्रग तस्कर विजय प्रसादला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस बिहारला रवाना
नांदेडमध्येही प्राप्तिकराची धाड?
ज्याप्रमाणे राज्यात विविध ठिकाणी प्राप्तिकराच्या धाडी होत आहेत, त्याच प्रमाणे नांदेड जिल्ह्यातही कार्यवाही होणार का, या प्रश्नावर त्यांनी सूचक इशारा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, माझ्या हसण्यावरून काही कळले तर तुम्ही लक्ष करा की प्राप्तिकराची कार्यवाही होणार की नाही होणार...
हेही वाचा-दोन वर्षानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरून महाआघाडी अन् भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप !
भास्करराव पाटील यांनी भाजप सोडल्यामुळे निवडणूक थोडी अवघड...!
माजी मंत्री भास्ककरराव पाटील यांनी भाजप सोडला आहे. त्यामुळे देगलूर बिलोली निवडणूक अवघड हे मला मान्य असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यामुळेच तर मला यावे लागत असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली.
सामानातून नुकतेच भाजपवर टीका
शिवसेनेचे मुखपत्र सामनाने नुकतेच केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या राज्यातील नेत्यांच्या घरांवर पडत असलेल्या धाडी आणि त्यांना दिला जाणाऱ्या त्रासाबद्दल सामनाने खरपून समाचार घेतला आहे. सामनातील रोखठोक या सदरात सत्य बोलणाऱ्यांवर धाडी आणि तपास यंत्रणांचा ससेमिरा लावायचा हीच नवी लोकशाही आणि स्वातंत्र्य असल्याचे म्हटले अग्रलेखात आहे. तुला काय धाड भरली आहे? अशा एका गंमतीशीर वाक्प्रचाराचा अनुभव सध्या महाराष्ट्र राज्य घेत आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की धाडींचे? असा प्रश्न पडावा इतक्या विक्रमी धाडी केंद्रीय तपास यंत्रणांकडून पडताना दिसत असल्याचे सामनातील अग्रलेखात म्हटले आहे.