नांदेड - केंद्रीय राज्य मार्ग निधी अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी याांनी जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 196 कोटी 20 लाख 34 हजार रुपयांचा निधी मंजूूर केेला आहे. यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि जिल्ह्यातील भाजपा आमदारांनी पाठपुरावा केेला होता.
जिल्ह्यातील रस्त्यांसाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह किनवटचे आ.भिमराव केराम, आ.तुषार राठोड, आ.राजेश पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. जिल्ह्यातील काही रस्त्यांचा केंद्रीय राज्य मार्गात समावेश करावा व त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 13 मुख्य रस्त्यांसाठी 196 कोटी 20 लाख 34 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
या रस्त्यांसाठी निधी मंजूर…
अर्धापूर तालुक्यातील पाटनूर-जाभरुण-दाभड-बामणी-कामठा-मालेगाव देगाव कुऱ्हाडा रस्ता, भोकर तालुक्यातील गारगोवाडी-नसलपूर-नेकाली ब्रिज-भुरभुशी-किनी-नांदा-गोरणटवाडी-दिवशी तांडा-कांडली-लगळूद-रावणगाव-मातूळ-खडकी ते शिवनगर तांडा रस्ता, नांदेड तालुक्यातील विष्णूपुरी-पांगरी-असदवन-गोपाळचावडी-तुप्पा रस्ता, बिलोली तालुक्यातील कुंटूर-कुंभारगाव-कोंडलवाडी-नागणी ते राज्य रस्ता, देगलूर तालुक्यातील देगलूर-करडखेड-हानेगाव ते कर्नाटक सिमा रस्ता, हिमायतनगर तालुक्यातील छोटा पुल अर्धापूर-तामसा-आष्टी-सोनारी-हिमायतनगर-सावना-जिरोना-शिवणी ते निर्मल आंध्रप्रदेश सिमा रस्ता, नांदेड तालुक्यातील मालेगाव-निळा-तळणी-रहाटी-जैतापूर रस्ता, अर्धापूर तालुक्यातील सोनाळा-रोडगी-पांगरी-लोणी बु.-लोणी खु.-बारसगाव-येळेगाव-देगाव-पिंपळगाव-शेळगाव-कामठा रस्ता (बारसगाव पाटी ते भाऊराव सहकारी साखर कारखाना), देगाव-जवळा (पाठक)-जवळा मुरार-निवघा-राज्य रस्ता क्र.261 पर्यंत रस्ता (राज्य रस्ता क्र.261 ते भाऊराव सहकारी साखर कारखाना), किनवट तालुक्यातील तामसा-हिमायनगर-सवना-जिरोणा-कोसमेट-शिवणी-गोडजेवली ते तेलंगाणा राज्य सिमा रस्ता, कंधार व नायगाव तालुक्यात बाचोटी-मंगलसांगवी-सावळेश्वर-चिखली-हळदा-कोलंबी-गोदमगाव-लालवंडी-नायगाव रस्ता, नायगाव तालुक्यातील उमरी-बेळगाव-कुंटूर-नायगाव राज्य रस्ता, मुखेड तालुक्यातील हणमंतवाडी-कुरुळा-उमरगा-खोजा (दिग्रस) गुंटू-वर्ताळा-वसंतनगर-पांडूर्णी-जिल्हा रस्ता या कामांचा समावेश केला आहे.