ETV Bharat / state

Nanded Car Accident : धार्मिक कार्यक्रमावरून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात, नांदेडमध्ये चौघांसह कार नाल्यात कोसळली - Nanded Car Accident

नांदेडमध्ये कारचा अपघात ( Car accident in Nanded ) झाला. या अपघातात कार दापका राजा (ता.मुखेड) पुलावरून खाली वाहत्या नाल्यात ( car fell into stream ) पडली. यात मागे बसलेले चार जणही पाण्यात पडले. सुदैवाने काचा फोडून ते बाहेर पडले. मात्र चालक पाण्यात बेपत्ता झाला आहे. नागरिकांनी, पोलीसांनी व तहसीलच्या पथकांनी तसेच रेस्क्यू टीमने ही कार पाण्यातून ओढून बाहेर काढली ( car pulled out from water ) आहे.

car fell into the drain
कार कोसळली नाल्यात
author img

By

Published : Sep 21, 2022, 6:02 PM IST

नांदेड - लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालूक्यातील हाडोळती येथील पाच युवक बाऱ्हाळी (ता.मुखेड) येथील वलीमा कार्यक्रम आटोपून सोमवार (दि. १९) रात्री नऊच्या सुमारास गावाकडे परतत होते. तेव्हा त्यांच्या कारचा अपघात ( Car accident in Nanded ) झाला. यावेळी त्यांची कार दापका राजा (ता.मुखेड) पुलावरून खाली वाहत्या नाल्यात ( car fell into stream )पडली. यात मागे बसलेले चार जणही पाण्यातपडले. सुदैवाने काचा फोडून ते बाहेर पडले. मात्र चालक पाण्यात बेपत्ता झाला आहे. नागरिकांनी, पोलीसांनी व तहसीलच्या पथकांनी तसेच रेस्क्यू टीमने ही कार पाण्यातून ओढून बाहेर काढली ( car pulled out from water ) आहे.

कार कोसळली नाल्यात

बेपत्ता चालकाचा शोध सुरू - अहमदपूर जिल्हा लातूर येथील हाडोळती येथे राहणारे कार क्रमांक ( एमएच१४- बीआर- ३०२१ ) चालक अझर सत्तार शेख हा आपल्या इतर चार मित्रांसोबत मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे वलीमाच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री ते आपल्या गावाकडे परतत असताना हिप्परगा शिवारात असलेल्या दापकाराजाच्या जवळ असलेल्या पुलावरून वाहत्या पाण्यात कार कोसळली. कारमधील अन्य चार जण काचा फोडून बाहेर पडल्याने सुखरूप ( All four fell into the stream along with car ) बचावले. मात्र चालक या अपघातात अजूनही बेपत्ता आहे. तहसीलदार काशिनाथ पाटील, पोलीस निरीक्षक विजय गोबाडे यांच्यासह रेस्क्यू टीम त्या ठिकाणी बेपत्ता चालकाचा शोध घेत आहेत. घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली असून मंगळवारी पहाटे ही कार पाण्यातून बाहेर काढली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.