नांदेड - हाथरस येथे खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातदेखील उमटले. नांदेडमध्ये काँग्रेसकडून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
राज्याच्या विविध भागात काँग्रेसच्या वतीने आंदोलने होत असून जिल्ह्यातही अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले आहेत. राहुल गांधींना धक्काबुक्की आणि मारहाण म्हणजे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधकांची दडपशाही करून त्यांचा आवाज दाबण्याचे काम काम सुरू आहे. देशाच्या राष्ट्रपतींनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार बरखास्त करून पीडित कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. यावेळी काँग्रेसचे आमदार, पदाधिकारी, ज्येष्ठ आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांकडून या नेत्यांना मिळालेल्या वागणुकीवरून सर्वत्र उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका केली जात आहे.
हेही वाचा - योगी सरकारच्या दंडेलशाहीविरोधात काँग्रेसची मंत्रालयाशेजारी जोरदार निदर्शने
हेही वाचा - राहुल गांधींची पोलिसांनी पकडली कॉलर, पाहा धक्काबुक्कीचा व्हिडिओ