ETV Bharat / state

मुखेडमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन, लॉकडाऊनमध्येही सोशल डिस्टन्सिंग राखत मुखेडकरांचा उत्तम प्रतिसाद - कोरोना अपडेट नांदेड

लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडीयाच्या माध्यमातून रक्तदान करण्याचे आवाहन मुखेडच्या नागरिकांना करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुखेडकरांनी स्वत:हुन घराच्या बाहेर येत रक्तदान केलं. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत 71 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. रक्तदात्यास फुलाचे पुष्पगुच्छ देत प्रमाणपत्रही वितरण करण्यात आले.

मुखेडच्या सुजान नागरीकांनी केल्या 71 बाटल्या रक्तदान

author img

By

Published : Apr 12, 2020, 9:32 AM IST

नांदेड - मुखेडातील नागरीकांनी मिळुन कोरोनाच्या संकटकाळात भव्य रक्तदानाचे आयोजन शहरातील आर्यवैश्य मंगल कार्यालय येथे 11 एप्रिल रोजी करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 71 बाटल्या रक्त संकलित करण्यात आल्या. करोना या भयंकर आजाराचं संपूर्ण देश संकटात असताना अनेकांनी मदतीचा ओघ सुरू केला आहे. प्रत्येक भारतीय नागरिक आप-आपल्या पध्दतीने मदत करत आहेत.

सध्या राज्यासह देशात सर्वच रक्तपेढीत रक्ताचा पुरवठा कमी असल्याने अनेक रुग्णांना रक्त पुरवठा होत नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडीयाच्या माध्यमातून रक्तदान करण्याचे आवाहन संयोजक विनोद दंडलवाड यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुखेडकरांनी स्वत:हुन घराच्या बाहेर येत रक्तदान केलं. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत 71 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. रक्तदात्यास फुलाचे पुष्पगुच्छ देत प्रमाणपत्रही वितरण करण्यात आले.

या रक्तदान कार्यक्रमास आ.डॉ. तुषार राठोड, पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, मुख्याधिकारी त्र्यंबक गवाले, पोउनि गजानन काळे, डॉ. विरभद्र हिमगिरे, माजी नगराध्यक्ष अनिल जाजु, नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, शाम एमेकर, काँग्रेस प्रवक्ते दिलीप कोडगिरे , राहुल लोहबंदे,विठठल इंगळे,डॉ. श्रावण रॅपनवाड, नपाचे बलभिम शेंडगे, किशोरसिंह चौहाण, महेश मुक्कावार, संजय वाघमारे, शंकर नाईनवाड, संयोजक विनोद दंडलवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.