ETV Bharat / state

बेपत्ता तरुणीचा संशयास्परीत्या विहिरीत आढळला मृतदेह - मृतदेह

१८ जानेवारीला रोशनी नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून घरी परतली. दप्तर ठेवून काही वेळातच ती घरातून निघून गेली. तेव्हापासून ती बेपत्ता होती.

girl death
संशयास्परित्या विहिरीत आढळला मृतदेह
author img

By

Published : Jan 21, 2020, 8:10 PM IST

नांदेड - बेपत्ता महाविद्यालयीन युवतीचा घराजवळील विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना मांडवीच्या दत्तनगर भागात घडली. दोन दिवसांपूर्वी रोशनी तुळशीराम राठोड ही युवती बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह सोमवारी संशयास्पदरीत्या घराशेजारील विहिरीत तरंगताना आढळून आला.

हेही वाचा - विकृतीचा कळस! चंद्रपुरात तरुणावर 14 जणांचा अनैसर्गिक अत्याचार, तरुणाची आत्महत्या

रोशनी ही सरस महाविद्यालयात १२वीत शिकत होती. १८ जानेवारीला रोशनी नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून घरी परतली. दप्तर ठेवून काही वेळातच ती घरातून निघून गेली. तेव्हापासून ती बेपत्ता होती. मुलगी घरी परत न आल्याने आई दुर्गा तुळशीराम राठोड यांनी मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार ५/२० कलम ३६३ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - तरुणीचा चोरून काढलेला व्हिडिओ टिक-टॉकवर व्हायरल करणे पडले महागात

मांडवीच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार शिवप्रसाद कराळे आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी विजय कोळी, वैजनाथ मोटरगे करीत आहेत.

Intro:नांदेड : बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला विहिरीत.

नांदेड : कॉलेजला जाऊन घरी परतलेल्या युवतीचे प्रेत घराजवळील विहिरीत दोन दिवसानंतर संशयास्पद विहिरीत आढळले या घटनेचा तपास मांडवी पोलीस करीत आहेत. मांडवीच्या दत्तनगर भागात राहणारी रोशनी तुळशीराम राठोड ही सरस विद्यालयात बारावीत शिकत होती.Body:
18 जानेवारी रोजी ती सकाळी कॉलेजला नेहमीप्रमाणे गेली दुपारी घरी परत आल्यावर ती स्कुल बॅग ठेऊन बाहेर गेली ती परत आलीच नाही. मुलगी परत न आल्याने तिची आई दुर्गा तुळशीराम राठोड यांनी तक्रार दिल्यावरून मांडवी पोलिसात गुरंन 5/20 कलम 363 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.Conclusion:बेपत्ता झालेल्या रोशनी चे प्रेत 20 जानेवारी दुपारी
घराजवळच्या विहिरीत तरंगताना आढळून आले.21 जानेवारी रोजी मांडवीच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास फौजदार शिवप्रसाद कराळे ,व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी विजय कोळी,वैजनाथ मोटरगे करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.