ETV Bharat / state

'महाविकास आघाडीला सत्तेजा माज आल्यानेच त्यांच्या तोंडी ''बघून घेऊची'' भाषा' - नांदेड लेटेस्ट न्यूज

पदवीधर निवडणुकीच्या प्रचारावेळी माजी मंत्री विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभरातील कारभारावर सडकून टीका केली आहे. या सरकार केवळ बघून घेतोची भाषा करत आहे. यांनी जनतेचा विश्वासघात केला जात आहे. कोरोना काळात सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

he patil slam thackeray govt in nanded
'महाविकास आघाडीला सत्तेजा माज
author img

By

Published : Nov 28, 2020, 9:03 PM IST

नांदेड - राज्यातील महाविकास आघाडीला सत्तेत येऊन वर्षपूर्ती झाली. परंतु आजपर्यंत या सरकारने शेतकरी, उद्योजक, बेरोजगार, युवक, शिक्षक, पदवीधर यांच्या प्रश्नासह मराठा, धनगर समाजाचे आरक्षणाला तिलाजंली देतच ही वर्षपूर्ती केली आहे. केवळ सत्तेचा माज चढल्यासारखे "बघून घेवू" अशी भाषा महाविकास आघाडी सरकारकडून वापरली जात आहे. या सरकारने जनतेच्या कल्यानासाठी एक ही कार्यक्रम राबवला नाही. या सरकारने जनतेचा विश्वासघात केला असल्याची टीका माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

तसेच या सरकारला, पदवीधर निवडणुकीत बाजुला ठेवुन पदवीधरांनी भाजपाचे उमेदवार बोराळकर यांना एक नंबरची पसंतीचे मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ते शनिवारी विष्णुपुरी येथील सहयोग सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित पदवीधर मतदारांना संवाद मेळाव्यात बोलत होते.

व्हिजन न देता बघून घेण्याची भाषा-

यावेळी पुढे बोलताना आमदार विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाल्याबद्दल मुलाखत दिली. या मुलाखतीला त्यांनी भविष्यातील कामाचे "व्हिजन" जनतेला न देता केवळ "बघून घेण्याची" भाषा केली असल्याचा आरोप विखे यांनी केला. तसेच कोरोना महामारीमुळे लाखो कामगाराच्या हातचा रोजगार गेल्याने ते सर्व बेकार झाले. अनेक उद्योग बंद पडले. अनेकांचे कुंटुंब उघड्यावर आले, तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास पाण्यात वाहुन गेला. तरी या सरकारने केवळ बघ्याची भूमिका बजावली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

जनतेचा विश्वास घात केला

या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याच्या अपेक्षा भंग केल्या, बेरोजगाराच्या हाताला काम नाही. शाळा, महाविद्यालय बंद करुन युवकांचे भविष्य आंधारात लोटले आहे. प्रसार माध्यमावर गदा आणून व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचे काम हे महाविकास आघाडी करत आहे. तीन पक्षाचे सरकार नव्हे तर हे बिघाडी सरकार आहे. या सरकारने अनुदानीत शाळेचा प्रश्न असो, शिक्षकांचे प्रश्न, किवा पदवीधराचे प्रश्ना असो एकही प्रश्न या सरकारने सोडवले नाहीत. यासह जनतेसाठी एकही कल्याणकारी योजना या सरकारने राबवली नाही. यामुळे जनतेत या सरकारने विश्वासघात केल्याची भावना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी भाजपच पर्याय-

बिहार राज्यातील मतदानात भाजपाला सर्वात जास्त मतदान महिलांनी केले. का तर केंद्रातील मोदी सरकारने कोविड काळात राज्यातील सर्व जनतेला धान्य पुरवठा करण्याचे काम केेले होते. कारण महिलांनाच माहिती असते कुंटुंबाचे पोट कसे भरायचे, त्यामुळे तेथील महिलांनी भाजपाला मतदान केले. मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाचे काय झाले? आज मराठा समाजातील मुलांना शाळेत व महाविद्यालयात प्रवेश हा सर्वसाधारण गटातून प्रवेश मिळत आहे. त्यामुळे मराठा समाजातील मुलाचे भविष्य आधातरी झाले आहे. या सर्व प्रश्नासाठी भाजपा हाच पर्याय आहे. त्यामुळे जनतेचा विश्वासघात करणार्या सरकारला घालवण्यासाठी पदवीधर मतदारानी भाजपाचे उमेदवार शिरिष बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मतदान करावे, असे आवाहन करुन मतदान करताना योग्य अंकाचा वापर करावे अन्यथा मागील निवडणुकीत ८ हजार मतदान बाद झाले होते, यांची दक्षता पदवीधरांनी घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले.

यावेळी खा. चिखलीकर यांनी उपस्थित पदवीधर मतदाराशी संवाद साधून भाजपाचे उमेदवार यांना पहिल्या पसंदीचे मतदान करण्याचे आवाहन केले.नया कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ. संतुकरा्व हंबर्डे यांनी केले तर सुञसंचलन डॉ. बालाजी गिरगावकर यांनी केले. यावेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. तुषार राठोड, सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव तथा माजी महानगर अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, महानगराध्यक्ष प्रविण साले, प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलिप कंदकुर्ते, मिलिंद देशमुख ,युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, श्रावण पाटील भिलवंडे, देविदास राठोड, दिलीपसिंह ठाकूर, विजय गंभीरे, व्यंकटराव मोकले, राजेंद्रसिंग पुजारी, अनिलसिंह हजारी, अशूतोष धर्माधिकारी, मनोज जाधव, संभाजी देशमुख, संदीप पावडे, केशव वानखेडे, अंकेश हंबर्डे, भरत पाटील, गणेश जाधव, संतोष पा. जानापुरीकर यांचासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.