ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात राबवणार कोरोना मुक्तीचा 'भोसी पॅटर्न'..! मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची माहिती

नांदेड जिल्ह्यातील भोसी हे गाव कोरोनामुक्त झाले आहे. भोकर तालुक्यातील जवळपास सहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने कोरोनामुक्त गाव करण्याची किमया केली आहे. हेच पॅटर्न जिल्हाभर राबवणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली आहे.

author img

By

Published : May 18, 2021, 8:23 PM IST

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

नांदेड - जिल्ह्यातील भोसी हे गाव कोरोनामुक्त झाले आहे. भोकर तालुक्यातील जवळपास सहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने कोरोनामुक्त गाव करण्याची किमया केली आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी केलेल्या उपाय योजनांची दखल घेत कोरोनामुक्तीचा भोसी पॅटर्न जिल्हाभर राबवणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली आहे.

भोकर तालुक्यातील भोसी गाव झाले कोरोनामुक्त

नांदेड जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णांची वाढ होत असताना भोसी हे गाव कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला होता. हॉटस्पॉट ठरलेल्या भोकर तालुक्यातील भोसी गावात 119 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने गावात कोरोनाची दहशत पसरली होती. मात्र, गावकऱ्यांनी एकत्र येत आरोग्याबाबत जनजागृती केली. ग्रामपंचायतीने केलेल्या नियमावलीचे पालन करत कोरोनाला रोखले आहे.

दोन महिन्यांपूर्वी आढळला होता पहिला रुग्ण

भोसी येथे साधारण दोन महिन्यांपूर्वी एका लग्न सोहळ्यानंतर एक मुलगी कोरोनाग्रस्त आढळली होती. मात्र, पुढील आठवड्यात त्यात भर पडली आणि पाच रुग्ण बाधित झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे गावात खळबळ उडाली होती. मात्र, या परिस्थितीला घाबरून न जाता ग्रामपंचायतीने योग्य नियोजन केले. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी ग्रामपंचायतीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत भयभीत झालेल्या ग्रामस्थांचे समुपदेशन करण्यात आले.

कोरोना चाचण्या करण्यावर दिला भर

कोरोनाला रोखण्यासाठी चाचण्या करणे गरजेचे होते. मात्र, अनेकांनी घाबरून चाचणी करण्यास नकार दिला होता. या लोकांचे समुपदेशन करण्यात आले आणि चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. 90 टक्के नागरिकांच्या अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यानंतर तब्बल 119 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे समोर आले.

विलगीकरणासाठी केला शेतीचा वापर

कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. या रुग्णांना विलगीकरण करणे गरजेचे होते. या रुग्णांना बंदिस्त इमारतीत ठेवण्याऐवजी शेतात राहण्याची व्यवस्था करण्यात आली. रुग्णांनी स्वतःच्या शेतात विलगीकरण करुन घेतले. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांची सोय जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख यांच्या शेतातील 40 बाय 60 आकाराच्या एका शेडमध्ये करण्यात आली. हे सर्व बाधित सुमारे पंधरा दिवस शेतातच राहिले.

आरोग्य सुविधा थेट रुग्णांपर्यंत

कोरोनामुक्तीसाठी शेतात विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांना आरोग्य सुविधाही देण्यात आली. प्रत्येक रुग्णांची प्रकृती जाणून घेण्यासाठी डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा वर्कर यांनी थेट शेतात असलेल्या रुग्णांपर्यंत जाऊन उपचार केले. गरजेनुसार रुग्णांना जागेवरच औषधे पुरविण्यात आली. दुसरीकडे या बाधितांच्या जेवणाची व्यवस्था शेतामध्येच करण्यात आली होती. त्यामुळे पंधरा दिवसानंतर सर्वच्या सर्व 119 बाधित कोरोनामुक्त झाले.

लसीकरणावर दिला भर

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण आवश्यक झाले आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून आवाहनही केले जाते आहे. मात्र, ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. अनेकजण लसीकरण घेण्यास नकार दिल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून सांगितले. भोसी गावतील जवळपास 3 हजार 500 नागरिकांनी लसीकरणासाठी सहभाग घेतला आहे. या सर्वांना कोविशील्डचा पहिला डोस देण्यात आला आहे. दुसऱ्या डोसलाही सुरुवात झाली आहे, अशी माहिती डॉ. राठोड यांनी दिली आहे.

कोरोनामुक्तीचा भोसी पॅटर्न जिल्हाभर राबवणार

कोरोनामुक्तीचा भोसी पॅटर्न ग्रामस्थ, जिल्हापरिषद सदस्य आणि आरोग्य विभागाने भोसी पॅटर्न तयार केला आहे. दीड महिना उलटून गेला मात्र तेथे एकही रुग्ण आढळून आलेला नाही. आता हा पॅटर्न जिल्ह्यात राबवणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले आहे. या मोहिमेबाबत वर्षा ठाकूर यांनी भोसी ग्रामस्थांचे कौतूक केले आहे.

हेही वाचा - नांदेडमध्ये अपघातग्रस्तांच्या तत्काळ मदतीसाठी 'हायवे मृत्युंजय दूत'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.