नांदेड : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या नांदेडमधील कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाला आहे. यामुळे गौतमीला अवघ्या 10 मिनिटांत कार्यक्रम बंद करावा लागला. आपल्या नृत्याने तरुणाईला भुरळ घालणारी सबसे कातील गौतमी पाटीलच्या लावणीचा जलवा सुरू असतानाच प्रेक्षकांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे गौतमीला हा कार्यक्रम बंद करावा लागला. यामुळे गौतमी आणि राडा असे नवे समीकरण तयार झाले आहे.
पोलिसांचा लाठीचार्ज : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, काही मिनिटांतच गौतमीला गाशा गुंडाळावा लागला. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रेक्षकांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे गौतमीला हा कार्यक्रम अवघ्या 10 मिनिटात बंद करावा लागला. रात्री नऊच्या सुमारास गौतमी पाटील स्टेजवर आली. त्यापूर्वीच धर्माबादच्या मोंढा मैदानात प्रचंड गर्दी झाली होती. महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. पण गौतमी पाटील येताच तिच्या चाहत्यांनी गोंधळ सुरू केला. मैदानात खुर्च्याची मोडतोड आणि धावपळ सुरू झाली. तेव्हा पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. हा गोंधळ पाहून गौतमीने पेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले. पण गोधळ थांबत नसल्याने गौतमीने 10 मिनिटांत कार्यक्रम बंद केला.
हुल्लडबाजीमुळे कार्यक्रम बंद : शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख आकाश रेड्डी यांनी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. यासाठी अनेक दिवसांपासून जाहिरातबाजी व बॅनर लावले होते. त्यातच गौतमी पाटील यांचा नांदेडमध्ये पहिला कार्यक्रम लावण्यात आल्याने धर्माबादच्या मोंढा मैदानात प्रचंड गर्दी झाली होती. महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. त्यातच गौतमी पाटील स्टेजवर येताच लोकांनी एकच गोंधळ घातला. लोकांच्या हुल्लडबाजीमुळे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम बंद करावा लागला. हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. मैदानात सौम्य लाठीचार्ज करावा लागला. गोंधळ थांबत नसल्यामुळे पोलिसांना स्टेजवर येऊन कार्यक्रम बंद करण्याच्या सूचना द्यावी लागली. त्यावेळेस गौतमी पाटील हिने शांततेचे आवाहन देखील केले. पण गर्दीतील लोकांची हुल्लडबाजी कायम होती, त्यामुळे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम बंद झाला.
हेही वाचा -