ETV Bharat / state

ग्रामीण भागातील तरुणाची मॉडेलिंग क्षेत्रात झेप... पिळदार शरीरयष्टीची नांदेडकरांना भुरळ - nanded modelling news

ग्रामीण भागातील अथर्व उदावंत या तरुणाने कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता मॉडेलिंग क्षेत्रात भरारी घेतली आहे. झेरॉन प्रोडक्शनच्या मिस्टर इंडिया या स्पर्धेत अथर्वने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत बाजी मारली. अथर्वच्या या यशाचं नांदेडकरांनी कौतुक केलं आहे.

modelling in nanded
ग्रामीण भागातील तरुणाची मॉडेलिंग क्षेत्रात झेप... पिळदार शरीरयष्टीची नांदेडकरांना भुरळ
author img

By

Published : Dec 28, 2020, 12:48 PM IST

नांदेड - ग्रामीण भागातील अथर्व उदावंत या तरुणाने कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता मॉडेलिंग क्षेत्रात भरारी घेतली आहे. झेरॉन प्रोडक्शनच्या मिस्टर इंडिया या स्पर्धेत अथर्वने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत बाजी मारली. अथर्वच्या या यशाचं नांदेडकरांनी कौतुक केलं आहे.

ग्रामीण भागातील तरुणाची मॉडेलिंग क्षेत्रात झेप... पिळदार शरीरयष्टीची नांदेडकरांना भुरळ
समाज माध्यमांवर अथर्वचे फोटो व्हायरलचमकदार डोळे, लांब केस आणि पिळदार शरीरानं नांदेडकरांना भुरळ घातली. वीस वर्षांचा अथर्व संजय उदावंत हा सध्या नांदेडकरांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. कमी वयात मिळवलेली पिळदार शरीरयष्टी आणि झेरॉन प्रोडक्शनच्या स्पर्धेत मिळवलेलं यश या चर्चेत निमित्त आहे. अथर्वला मॉडेलिंग क्षेत्रात काम करायचं आहे.पिळदार शरीरयष्टी कमवण्यासाठी घेतली मेहनतवीस वर्षीय अथर्वचे शिक्षण सैनिक शाळेत झालं. त्यामुळे बालपणापासूनच व्यायामाती सवय लागली. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेताना देखील अथर्वने ती आवड कायम ठेवली. व्यायाम आणि डाएट यात सातत्य राखत त्याला हे यश मिळवता आलं.ग्रामीण भागात मॉडेलिंगसाठी पूरक वातावरण नाहीमराठवड्यासारख्या ग्रामीण भागात मॉडेलिंगसाठीचं प्रशिक्षण मिळत नाही. यासाठी तरुणांना पुणे आणि मुंबई सारख्या शहरात जावं लागतं. त्यासाठी लागणारा खर्च देखील मोठा आहे. त्यामुळे अनेकजण इच्छा असताना देखील मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करू शकत नाहीत.झेरॉन प्रोडक्शन स्पर्धेत ४८० देशभरातून स्पर्धकांची निवडझेरॉन प्रोडक्शन हाऊस ही मॉडेलिंग क्षेत्रातील नावाजलेली संस्था आहे. मिस्टर इंडिया या स्पर्धेसाठी शेकडो मुलं यात सहभागी होतात. अथर्वने आपलं शारीरिक कौशल्य दाखवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. या फेरीत एकूण ४८० स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. अंतिम स्पर्धा जानेवारी २०२१ मध्ये दिल्ली येथे पार पडणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.