नांदेड - काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश Ashok Chavan never leave congress करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहेत. पण त्या अफवा आहेत. हे सगळं षड्यंत्र आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे Congress leader Manikrao Thackeray यांनी दिली. राहुल गांधीच्या भारत जोडो अभियानाच्या Bharat Jodo Abhiyan पूर्व तयारीची बैठक आज नांदेडमध्ये पार पडली. या बैठकीसाठी माणिकराव ठाकरे नांदेडला आले होते. अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार झाली.
दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाच्या Ashok Chavan leave congress अफवा निराधार आहेत खोट्या आहेत . काही पक्ष काही मंडळी या अफवा पसरवत असल्याचे माणिकराव ठाकरे म्हणाले.
अशोक चव्हाण प्रामाणिकपणे काँग्रेसच्या सोबत आहेत.काँग्रेस मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांच्या बद्दल असे विचार पेरणे, त्यावर चर्चा करणे मला वाटतं हे सगळं षड्यंत्र आहे. या षड्यंत्राला बळी पडू नका असं माणिकराव ठाकरे म्हणाले. अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेशाबाबत अधिक बोलण्याचे टाळले. आजची भारत जोडोची ही बैठक त्या सर्व चर्चाना उत्तर असल्याचे यावेळी अशोक म्हणाले. काँग्रेसच्या कार्यक्रमात आपण सक्रिय असल्याचा संदेश अशोक चव्हाण यांनी दिला.
हेही वाचा - Heavy Rain In Maharashtra : राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्याता