नांदेड - 'सध्या महाराष्ट्रात चालू असलेले 'राजकीय वाॅर' थांबले नाही, तर गॅंगवाॅर होईल,' अशी भीती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ( Ashok Chanvan Political War Statement ) व्यक्त केली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे. त्याचा समतोल राखणे आवश्यक आहे. तरच विकासाचे कामे करता येतील, असेही चव्हाण म्हणाले.
'मराठवाड्यात बुलेट ट्रेन व्हावी हे स्वप्न' - जिल्ह्य़ातील कुंटूर (ता.नायगाव) येथे माजी मंत्री दिवंगत गंगाधरराव कुंटूरकर स्मृतीस्थळाच्या उदघाटन सोहळ्यात चव्हाण बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चव्हाण आज एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना महाविकास आघाडीचं उत्तम चालल आहे. तुम्ही थोडं अँडजस्ट केलं, तर आणखी उत्तम चालेल, अशी कोपरखळीही अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांना मारली. विदर्भाला बुलेट ट्रेन होत आहे. मराठवाड्यातही बुलेट-ट्रेन व्हावी, हे आमचे स्वप्न आहे. रावसाहेब दानवेंना सांगा आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही लक्ष घाला. नांदेड मार्गे हैद्राबादला बुलेट ट्रेनला मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा - Ajit Pawar Criticized Raj Thackeray : उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज ठाकरेंवर बोचरी टीका, म्हणाले...