ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात.. शरद पवार, ठाकरे सहभागी होणार

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) मार्ग पृथ्वीराज चव्हाण किंवा अशोक चव्हाण यांनी ठरवला नाही तर तो अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ठरवला, अशी प्रतिक्रीया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Former Minister Ashok Chavan ) यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर दिली. यात्रेच्या मार्गावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Former CM Prithviraj Chavan )यांनी मार्ग कुणी ठरवला माहीत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती, त्यावर अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रेचा रास्ता काँग्रेसनेच ठरवला - माजी मंत्री अशोक चव्हाण
author img

By

Published : Nov 1, 2022, 9:09 PM IST

Updated : Nov 1, 2022, 10:56 PM IST

नांदेड : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) मार्ग पृथ्वीराज चव्हाण किंवा अशोक चव्हाण यांनी ठरवला नाही तर तो अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ठरवला, अशी प्रतिक्रीया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Former Minister Ashok Chavan ) यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर दिली. यात्रेच्या मार्गावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Former CM Prithviraj Chavan )यांनी मार्ग कुणी ठरवला माहीत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती, त्यावर अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली.

भारत जोडो यात्रेविषयी माहिती देण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

'मी चालणार' घोषवाक्याचे अनावरण - काँग्रेस नेते राहूल गांधी यांची कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्हयातील देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होत आहे. १० नोव्हेंबर रोजी यात्रेचे नांदेड शहरात आगमन होणार आहे. सायंकाळी नवा मोंढा येथे सभा होणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, 'मी चालणार' घोषवाक्याचे अनावरण यावेळी करण्यात आले. भारत जोडो यात्रेविषयी माहिती देण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती - ८ नोव्हेंबर रोजी शरद पवार हे नांदेडमध्ये मुक्कामी येणार असून ९ नोव्हेंबर रोजी नायगांव येथे ते पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी देखील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्या संदर्भातील सहमती दर्शवली आहे. परंतु ते यात्रेत कधी सहभागी होणार हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. समाजसेविका मेधा पाटकर या देखील भारत जोडोशी जोडल्या जाणार आहेत. लोकचळवळ निर्माण करण्याचा यात्रेचा हेतू असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

यात्रेदरम्यान महाराष्ट्रात दोन जाहीर सभा - नांदेड जिल्ह्यात यात्रेचा चार दिवस मुक्काम असणार आहे. पदयात्रेनंतर काॅर्नर मिटिंग देखील होतील. १० नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये नवा मोंढा येथे दुपारी साडेचार वाजता जाहीर सभा होणार आहे. नांदेड जिल्ह्यात १२० किलोमीटर ही पदयात्रा असणार आहे. राज्यात या यात्रेचा मार्ग तीनशे किलोमीटरचा असणार आहे. हिंगोलीत देखील चार दिवस यात्रेचा मुक्काम राहणार असून, या दरम्यान महाराष्ट्रात दोन जाहीर सभा होणार आहेत. या जाहीर सभांपैकी एक नांदेडमध्ये तर दुसरी शेगाव येथे सभा होणार आहे. दररोज २४ किलोमीटरची यात्रा सकाळी सहा वाजता सुरू होईल. १२ किलोमीटर नंतर विश्रांती आणि नंतर दुपारी साडेतीन ते सात असा कार्यक्रम असेल, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

यात्रेत जनसामान्यांचा वाढता सहभाग - एकता, अखंडता, बंधुभाव आणि लोकशाही टिकवण्यासाठी ही भारत जोडो यात्रा काढण्यात येत आहे. यात्रा सर्व राज्यातून प्रतिसाद मिळत आहे.सर्वसामान्यांमध्ये यात्रेबद्दल प्रचंड उत्सूकता, आकर्षण आहे. केवळ काँग्रेसचीच ही यात्रा नाही, तर सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना व सर्वसामान्यांचा देखील या यात्रेत सहभाग असणार आहे.लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता `मी चालणार` हे घोषवाक्य आम्ही तयार केले आहे. एलईडी व्हॅन मार्फत यात्रे संदर्भातील आतापर्यंतची माहिती पोहचवण्याचे काम करत आहोत.

Last Updated : Nov 1, 2022, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.