नांदेड - माझ्याविरूद्ध निष्ठावंत सोडून आयात उमेदवार देणाऱ्यांकडून मला फुकटच्या सल्ल्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विनोद तावडे यांना दिले आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये, पुन्हा लोकसभेची पुनरावृत्ती होणार आहे, असा माझा त्यांना सल्ला असल्याचे विनोद तावडे आज नांदेड मध्ये म्हणाले होते.
त्यावर चव्हाण यांनी तावडे यांना प्रत्युत्तर दिले. ते नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मला सल्ला देण्याऐवजी तुम्ही तुमच्याच पक्षातील इच्छुक उमेदवारांना हा सल्ला द्या, कारण अनेकांच्या कोपराला तुम्ही गूळ लावून ठेवला आहे. तेव्हा निवडणुकीत मोठी बंडखोरी होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षातील लोकांना सल्ला द्या, मला फुकटच्या सल्ल्याची गरज नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. दरम्यान, भाजपाला माझी भीती वाटत आहे. त्यामुळे अशी विधान केली जात असल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा - अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवू नये, तावडेंचा अजब सल्ला