नांदेड - शेतकरी कायद्या बाबद केंद्र सरकारने घेतलेली भूमिका चुकीची आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. यामुळे उद्रेक होणे साहजिक आहे. मात्र, या हिंसेचे काँग्रेस समर्थन करणार नाही. आंदोलनाला गालबोट लावणाऱ्या कोणत्या शक्ती आहेत का?, हे देखील तपासलं पाहिजे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
नांदेड- दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. याबाबद सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी कायदा हा शेतकऱ्यांचं शोषण करणारा कायदा आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. मात्र, केंद्र सरकारने ज्या पद्धतीने परिस्थितीला हाताळले ते चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला. तरीही शेतकऱ्यांचं समाधान झालेले नाही. म्हणून हा उद्रेक होणे साहजिक आहे. आम्ही या हिंसेचे समर्थन करणार नाही. काँग्रेसचा शेतकरी आंदोलना पाठींबा आहे. झालेली हिंसा ही निंदनीयच आहे. आंदोलनाला गालबोट लावणाऱ्या कोणत्या शक्ती आहेत का?, हे देखील तपासले पाहिजे. अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.