ETV Bharat / state

Indian Independence Day तेंलगणाच्या सीमेवर आदिवासी पाड्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा

तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या  किनवट तालुक्यातील कोलामपोड या अतिदुर्गम आदिवासी कोलामवस्तीवर हर घर तिरंगा Har Ghar Tiranga अभियानचा शुभारंभ करण्यात आला चारी बाजूने डोंगर रांगेत विसावलेल्या तब्बल 23 कोलाम वस्ती व इतर आदिवासी पाडे Adivasi Pada येथील लोक उत्सवात हिरीरीने सहभागी झाले होते

Gharghar TrirangaAnd Gharghar Triranga's Abhina beginss Abhina begins
र घरघर तिरंगाचा अभिनाचा शुभारंभ
author img

By

Published : Aug 15, 2022, 11:57 AM IST

नांदेड तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या किनवट तालुक्यातील कोलामपोड या अतिदुर्गम आदिवासी कोलामवस्तीवर आज घरोघरी तिरंगाचा Har Ghar Tiranga अभिनव शुभारंभ करण्यात आला. चारी बाजूने डोंगर रांगेत विसावलेल्या तब्बल 23 कोलाम वस्ती व इतर आदिवासी पाडे Adivasi Pada या उत्सवात हिरीरीने सहभागी झाले होते.अवघ्या १५ उबंरठयाच्या कोलामपोड येथील या उत्सवाला साक्षीदार होण्यासाठी आमदार भिमराव केराम जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार तहसिलदार डॉ मृणाल जाधव जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार गटविकास अधिकारी सुभाष धनवे आदी उपस्थित होते. गावातील जेष्ठ महिला नागुबाई अर्जून टेकाम ही महिला गावातील इतर महिला समवेत आपल्या दाराला तिरंगा लावण्यासाठी सज्ज झाल्या. सडे आणि रांगोळीने सजलेल्या खांबाला त्यांनी तिरंगा लावून देश प्रेमाची एक नवी ऊर्जा दिली. या देशाची आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान झाली आहे. याचा सर्वांना आम्हाला अभिमान आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व देशाप्रती कृतज्ञता म्हणून आम्हाला हा तिरंगा उत्सव साजरा करताना विशेष आनंद असल्याच्या भावना नागुबाईने आपल्या तोडक्या भाषेत सांगितल्या.

प्रतिमेचे मान्यवरांनी केले पूजन किनवट येथील आदिवासी विकास प्रकल्प मार्फत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व घरोघरी तिरंगा हा उपक्रम प्रत्येक पाड्यावर साजरा होण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजन केले. प्रकल्पातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः एकेक पाडा निवडून त्या ठिकाणी आदिवासी बांधवांसमवेत घरोघरी तिरंगा उत्सव साजरा केल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण एच पूजार यांनी दिली. यावेळी मान्यवरांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. गावातून विविध पाडयामधून विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढून अवघा परिसर देशभक्तीमय केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr Babasaheb Ambedkar शहीद भगवान बिरसा मुंडा Martyr Lord Birsa Munda शामादादा कोलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते सत्कार लिंबगुडा येथील रहिवाशी व शासकीय आश्रमशाळा तलाईगुडा येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या आदिम कोलाम समाजातील जयश्री भीमराव पुरके ही जवाहर नवोदय विद्यालयात प्रविष्ठ झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शासकीय आश्रम शाळा तलाईगुडा येथील विद्यार्थिनी व तलाईगुडा येथील युवकांनी आदिवासी ढेमसा नृत्य सादर करून मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी ग्रामस्थ राजाराम मडावी यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी आभार मानले. याप्रसंगी बालविकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड महाजन अर्जून टेकाम गावातील ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी आदिवासी निरीक्षक स्मिता पहुरकर संदीप कदम केंद्र प्रमुख प्रतापसिंग राठोड मुख्याध्यापक सचिन चव्हाण जी. व्ही. चव्हाण शंकर नागोशे हमीद सय्यद विनोद जक्कीलवाड अभि सचिन येरेकर विस्तार अधिकारी एस.आर. शिंदे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा : Modi Speech Highlights लाल किल्ल्यावरून वीर सावरकरांनंतर पंतप्रधान मोदींनी नेहरूंची आठवण काढली, भाषणातील महत्त्वाचे मुद्दे वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.